शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: ‘करवीर’मध्ये महायुती नडली; काँग्रेसची वाढणार डोकेदुखी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:45 IST

शिंदेसेना, भाजपच्या आशा पल्लवित

प्रकाश पाटीलकोपार्डे : जिल्हा परिषदपंचायत समिती मतदारसंघाची फेररचनेने करवीर तालुक्यात राजकीय पक्षांची गणिते विस्कटणार आहेत. गेली अनेक वर्षे जिल्हा परिषदेसहपंचायत समितीवरकाँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले. मात्र, फेररचना आणि राजकीय सत्ता पाहिली तर काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणारी ठरणार हे मात्र निश्चित आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक जिल्हा परिषद १२ व पंचायत समितीचे २४ सदस्य करवीर तालुक्यात आहेत. फेररचनेमध्ये पाडळी खुर्द हा नवीन मतदारसंघाची निर्मिती झाली असली तरी त्याचे पडसाद इतर मतदारसंघांवर झाले. गावाची मोडतोड केल्याने अनेकांची गणिते बिघडली तर काहींचे गणित सोपे झाले आहे.मागील निवडणुकीत अकरापैकी ५ जागा जिंकत काँग्रेसने आपला दबदबा कायम राखला होता. शिंगणापूरमधून अपक्ष विजयी झालेल्या रसिका पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने तालुक्यात काँग्रेस भक्कम झाली होती. पंचायत समितीच्या स्थापनेपासून करवीर पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

फेररचनेत मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची मोडतोड झाली आहे. त्यात, ‘करवीर’ व ‘कोल्हापूर दक्षिण’चे दोन्ही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे येथे शिंदेसेना व भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘शिये’, ‘वडणगे’ या मतदारसंघावर आमदार चंद्रदीप नरके यांची पकड आहे. ‘शिंगणापूर’ चा निकाल प्रत्येक वेळी धक्कादायक लागला आहे. येथून शिंदेसेना व काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवार कोण? हे जरी महत्त्वाचे असले तरी शिंदेसेना व काँग्रेसमध्ये निकराची झुंज होणार आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनीही शड्डू ठोकल्याने आमदार चंद्रदीप नरके यांच्यासमोर पेच राहणार आहे.आरक्षणानंतर इच्छुक पत्ते खोलणारमतदारसंघ निश्चित झाल्यानंतर इच्छुकांनी शड्डू ठोकले असले तरी प्रत्यक्षात आरक्षण काय पडणार यावर गणित राहणार आहे. आरक्षणानंतरच इच्छुक पत्ते खोलणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहातील बलाबल

  • काँग्रेस -५
  • भाजप ३
  • शिवसेना -२
  • अपक्ष- १

पंचायत समितीचे बलाबल

  • काँग्रेस -१५
  • शिवसेना -४
  • भाजप -३

करवीर विधानसभा मतदारसंघ - शिये, वडणगे,शिंगणापूर, सांगरूळ, पाडळी खुर्द, सडोली खालसा,दक्षिण विधानसभा मतदारसंघ- निगवे खालसा, कळंबे तर्फे ठाणे, पाचगाव, गोकुळ शिरगाव, मुडशिंगी, उचगाव