शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गुंडप्रवृत्ती हटवा...जोतिबावर पगारी पुजारी नेमा; परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:45 IST

यात्रा झाल्यावर चौकशी करून योग्य कारवाई : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : श्री जोतिबा मंदिरातील गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरुपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नियुक्ती करा, भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सोमवारी परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जोतिबा यात्रा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले.परिते गावच्या वार्षिक यात्रेनिमित्त २२ तारखेला ५०० ग्रामस्थ जोतिबावर सासनकाठी पूजनासाठी आले होते. त्यावेळी हलगी वादनावरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादाचे मारहाणीत रूपांतर झाले. पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केलीच; शिवाय भाविकांनी मद्यप्राशन केल्याची बदनामी केली. यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी पुजारी हटावची हाक दिली होती. परितेच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी अन्य जिल्ह्यातील भाविकांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोमवारी सकाळी ग्रामस्थ मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, परिते गावचे सरपंच मनोज पाटील, शेतकरी सेनेचे राज्यसचिव जनार्दन पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन दिले. यावेळी मंदिरातील पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नेमावेत तसेच मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. 

वाचा: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावनायासह पुजाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्यावर थेट दर्शन देण्याची पद्धत तत्काळ बंद करावी, प्रशासनाच्या दानपात्राव्यतिरिक्त अन्य देणगी पात्रे हटवावीत या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी जोतिबा यात्रा संपल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी अजित पाटील, सर्जेराव पाटील, सुनील कारंडे, विलास पाटील आदी उपस्थित होते.

मोर्चातील घोषणाभाविकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, नाही चालणार नाही चालणार दादागिरी नाही चालणार, सर्वसाक्षी जगती ज्याची त्याला नको मध्यस्थी, भक्तांना न्याय मिळालाच पाहिजे. गब्बर पुजारी हटाव..जोतिबा मंदिर बचाव, जोतिबा देवाला पुजाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करू अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur villagers demand removal of rogue priests at Jyotiba Temple.

Web Summary : Villagers demand removal of exploitative priests at Jyotiba, requesting salaried appointments like Pandharpur. Allegations include beating devotees and financial misconduct. An investigation is promised after the Jyotiba Yatra.