संजय पवार यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST2020-12-13T04:37:50+5:302020-12-13T04:37:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : शिवसेनेशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या व पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे यांना पक्षाच्या ...

Remove Sanjay Pawar from the post of district chief | संजय पवार यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करा

संजय पवार यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला करा

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : शिवसेनेशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या व पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे यांना पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय करता; मग तुम्ही कट्टर शिवसैनिक कसे? असा सवाल करीत गद्दारांना पाठीशी घालणारे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पदावरून बाजूला करा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

इंगवले म्हणाले, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून संजय पवार यांच्या समर्थकांनी राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात काम केले. त्याचे पुरावे आपण संपर्कप्रमुखांसह वरिष्ठांकडे पाठविले. वरिष्ठांनी आम्हालाच सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. आता तर पक्षाची गद्दारी करणाऱ्यांना घेऊन ते कार्यक्रम करीत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. महापालिका निवडणुकीच्या अगोदर पवार यांना पक्षातून बाजूला करावे, अशी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व संपर्कमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी करणार आहे. यावेळी रवी चौगुले, दीपक गौड, अरुण सावंत, जयवंत हारुगले, रघुनाथ टिपुगडे, आदी उपस्थित होते.

मुश्रीफ, सतेज यांच्याविरोधात का बोलत नाही?

शिवसेनेवर सातत्याने हल्ला करणारे भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्याविरोधात संजय पवार का बोलत नाहीत? पवार यांना जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केले नाहीत? तर पक्षाची अधोगती सुरू होईल, असे इंगवले यांनी सांगितले.

- राजाराम लोंढे

Web Title: Remove Sanjay Pawar from the post of district chief