छत्रपती शिवरायांच्या आरक्षित जागेसमोरील बसथांबा हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST2020-12-15T04:39:37+5:302020-12-15T04:39:37+5:30
जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालयाकरिता जयसिंगपूर शहरातील आरक्षित जागेसमोरील बसथांबा हटवावा, अशा मागणीचे ...

छत्रपती शिवरायांच्या आरक्षित जागेसमोरील बसथांबा हटवा
जयसिंगपूर : छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालयाकरिता जयसिंगपूर शहरातील आरक्षित जागेसमोरील बसथांबा हटवावा, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेला देण्यात आले.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून शहरवासीयांचे प्रयत्न सुरू आहेत. सद्य:स्थितीत हा प्रश्न सोडविणे शहरवासीयांच्या प्रतिष्ठेचा आणि आत्मसन्मानाचा प्रश्न बनला आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व महाराजांसंबंधित शस्त्रांचे व ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारण्याकरीता आरक्षित जागा आहे. मात्र, या जागेसमोर खासगी बसथांबा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हा बसथांबा हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा बसथांबा काढला नाहीतर स्वखर्चाने हटविण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनावर चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बजरंग खामकर, अशोक पाटील, अॅड. धनंजय दळवी, सुनील ताडे, संदीप जाधव, आदम मुजावर, तेजस कुराडे, सागर हजारे, सदाशिव शिंदे, शंकर नाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.