कोल्हापूर : पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.आमदार जाधव यांनी शहरात २००५,२०२९ मध्ये पूर पातळी किती होती, त्यावेळी नागरिकांचे स्थलांतर कशा पद्धतीने केले होते याची माहिती घेतली. यामध्ये नेहमी पाणी किती येते, मच्छिंद्री झाली असता पाणी किती येते आणि महापुराने धोका पातळी ओलांडल्यानंतर पाणी किती येते, याचाही आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त निखिल मोरे, रमेश मस्कर, रावसाहेब चव्हाण, बाबूराव दबडे, अग्निशामन प्रमुख रणजित चिले उपस्थित होते.उपसा पंप उचलून घ्याबालिंगा येथील पंपिंग स्टेशन पुरात बुडाल्याने ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होतो. त्या दृष्टीने पाण्याचे पंप उचलून घेण्याची सूचनाही आमदार जाधव यांनी यावेळी केली.दोन्ही खणींत पाणी मिसळू नयेशहरातील टाकाळा खण व सरनाईक कॉलनी येथील कदम खणीमध्ये पावसाचे पाणी मिसळून तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यासाठी दोन्ही खणींच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून पाणी खणीत मिसळू नये, यासाठी नियोजन करण्याचेही आमदार जाधव यांनी म्हटले.
पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा :चंद्रकांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 11:34 IST
पूरबाधित नागरिकांचे वेळीच स्थलांतर करा, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली. मागील आठवड्यामध्ये आमदार जाधव यांनी शहरात महापुरासंदर्भात पदाधिकाऱ्यांसोबत दौरा केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
पूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा :चंद्रकांत जाधव
ठळक मुद्देपूरबाधित नागरिकांचे स्थलांतर करा :चंद्रकांत जाधव