कुरुंदवाडमधील अतिक्रमणे नियमित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST2021-03-31T04:23:32+5:302021-03-31T04:23:32+5:30
कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणे नियमित करावीत, या मागणीचे निवेदन शहर बचाव कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना ...

कुरुंदवाडमधील अतिक्रमणे नियमित करा
कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमणे नियमित करावीत, या मागणीचे निवेदन शहर बचाव कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना देण्यात आले. आठ दिवसांत याबाबत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. शिष्टमंडळाचे नेतृत्व पालिका विरोधी आघाडी प्रमुख व ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे यांनी केले.
दरम्यान, मुख्याधिकारी जाधव यांनी अतिक्रमित जागा मोजणीसाठी तालुका भूमिअभिलेख विभागाकडे दोन वेळा अर्ज करण्यात आला आहे. पुन्हा स्मरणपत्र पाठवून मोजणीबाबत पाठपुरावा करण्याचे तसेच शहराच्या हद्दीपासून दोनशे मीटर अंतरापर्यंत मिळकतधारकांना बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शहरातील अतिक्रमणे कायम करण्याबाबत शासन निर्णय होऊनही पालिका स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याने कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात नगरसेवक अनुप मधाळे, उदय डांगे, किरण जोंग, उमेश कर्नाळे, रणजित डांगे, आझम गोलंदाज, अजय भोसले, सिकंदर सारवान, अर्शद बागवान, बबलू पवार, सीताराम भोसले, चाँद कुरणे यांच्यासह अतिक्रमणधारक सहभागी झाले होते.