शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘कृषी सन्मान’ची नोंदणी ३ लाखांवर, १२०९ गावांतील माहिती संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 5:42 PM

कोल्हापूर : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ८२ हजार अर्जांची शनिवारी सकाळपर्यंत आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली. दिवसभरात ...

ठळक मुद्दे‘कृषी सन्मान’ची नोंदणी ३ लाखांवर, १२०९ गावांतील माहिती संकलित रविवारी तालुक्याच्या ठिकाणी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पेन्शन वितरण

कोल्हापूर : पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी जिल्ह्यातील सुमारे २ लाख ८२ हजार अर्जांची शनिवारी सकाळपर्यंत आॅनलाईनद्वारे नोंदणी झाली. दिवसभरात यामध्ये वाढ होऊन जवळपास तीन लाखांवर हा आकडा गेला.

जिल्ह्यातील १२०९ गावांतील माहिती संकलित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात १० शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व तालुकास्तरावरही अशाच पद्धतीने कार्यक्रम घेतला जाणार आहे.पंतप्रधान कृषी सन्मान योजनेकरिता आॅनलाईनद्वारे नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. चौथ्या शनिवारी सुट्टीचा दिवस असूनही महसूलसह कृषी, सहकार व ग्रामविकास विभागाची यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयासह गावागावात कार्यरत होती.

शनिवारी सकाळपर्यंत २ लाख ८२ हजार जणांची नोंदणी आॅनलाईनद्वारे करण्यात आली. दिवसभरात हा आकडा सुमारे तीन लाखांवर गेला. यातील पात्र लाभार्थ्यांपैकी १० जणांना प्रातिनिधीक स्वरुपात आज, रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पेन्शनचे वितरण केले जाणार आहे.

सर्व तहसीलदार कार्यालयांच्या ठिकाणीही अशाच पद्धतीने कार्यक्रम घेऊन दहाजणांना पेन्शन दिली जाणार आहे. यानंतर आॅनलाईनद्वारे संकलित झालेल्या लाभार्थ्यांच्या माहितीची शहानिशा करून व वैधता तपासून पेन्शन संबंधितांच्या खात्यावर जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर