शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

अवैध बसेसवर ‘प्रादेशिक परिवहन’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:51 IST

अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

ठळक मुद्देअवैध बसेसवर ‘प्रादेशिक परिवहन’चा बडगा अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर कारवाई

कोल्हापूर : अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.नागालँड, अरुणाचल प्रदेश, गुजरात, आदी राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या अवैध बसेस कोल्हापुरात आढळून आल्या आहेत. या बसेस महाराष्ट्राचा कर भरत असल्या तरी त्या वाहनांची लांबी प्रमाणापेक्षा अधिक आहे.

वाहनांचा ओव्हरहँग जास्त आहे. वाहनांमध्ये ३२ ऐवजी ३६ स्लिपर आसने आहेत. या वाहनांची बांधणी नियमबाह्य आहे. अशा वाहनांतून प्रवास करणे धोकादायक आहे; त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर बुधवारपासून कारवाईस प्रारंभ केला. त्यात १२ वाहनांवर कारवाई करीत ती अटकावून ठेवण्यात आली.

कारवाईत वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्यात आले आहे. कारवाई झालेल्या वाहनांमध्ये वैभव ट्रॅव्हल्स, एम. बी. लिंककक, परिख ट्रॅव्हल्स, संगीता, सनराईज, हर्षाली, नॅशनल, आदींचा समावेश आहे.कारवाई झालेल्या वाहनांचे क्रमांक असा :एआर०१ जे ५६८६, एआर ०२ ६०५१, एआर ०१ जे ३००७, एनएल०१ बी १८१४, एनएल०१ बी १७६७, एनएल०१ बी १६१७, जीजे०५ बीव्ही ६९३२, जीजे१४ झेड ७००२, एआर ०१ जे ४९८१, एआर २० ६६६६, एआर ०२ ६०५१ या बसेसचा समावेश आहे.

आपण ज्या खासगी बसेसमधून प्रवास करणार आहात, त्या बसेसचा नोंदणी क्रमांक तपासावा. जर एआर, एनएल, जीजे असा असेल तर त्या वाहनांतून प्रवास करू नये. हा प्रवास धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी या बसेसची तक्रार संकेतस्थळावर करावी.- डॉ. स्टीव्हन अल्वारिस,प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसkolhapurकोल्हापूर