'रेडीरेकनर दरवाढीचा पुनर्विचार करण्यास शासनाला विनंती करणार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 02:46 AM2020-09-13T02:46:38+5:302020-09-13T02:47:04+5:30

शासनातर्फे सन २०२०-२१ या कालावधीकरिता वार्षिक मूल्यदर तक्ता (रेडिरेकनर) शुक्रवारी जाहीर झाला.

Redreckner urges govt to reconsider hike | 'रेडीरेकनर दरवाढीचा पुनर्विचार करण्यास शासनाला विनंती करणार'

'रेडीरेकनर दरवाढीचा पुनर्विचार करण्यास शासनाला विनंती करणार'

Next

कोल्हापूर : ‘क्रिडाई महाराष्ट्र’तर्फे आम्ही रेडिरेकनरच्या दरवाढीचा पुनर्विचार करण्यास शासनाला विनंती करणार आहोत, अशी माहिती ‘क्रिडाई’ या बांधकाम व्यावसायिक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजीव परीख यांनी शनिवारी येथे दिली.
शासनातर्फे सन २०२०-२१ या कालावधीकरिता वार्षिक मूल्यदर तक्ता (रेडिरेकनर) शुक्रवारी जाहीर झाला. वास्तविक सध्याची व्यवसायाची परिस्थिती पाहता शासनाने रेडिरेकनरचे दर कमी करणे अपेक्षित होते; परंतु एकंदरीत या दरपुस्तकाचा आढावा घेतला असता बऱ्याच ठिकाणी स्थावर मिळकतींचे दर वाढलेले दिसत आहेत. त्यामुळे शासन, महानगरपालिकांना भरावयाचे विविध प्रीमियम, सेस यांमधून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा मानस दिसून येत आहे, असे परीख यांनी म्हटले आहे.

Web Title: Redreckner urges govt to reconsider hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.