वरिष्ठ महाविद्यालयांत प्राध्यापकांची शंभर टक्के भरती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 20:05 IST2020-12-28T20:01:41+5:302020-12-28T20:05:48+5:30
profesar kolhapur- वरिष्ठ महाविद्यालयांत प्राध्यापकांची शंभर टक्के भरती करा, पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांनी (सीएचबीधारक) निर्दशने केली.

वरिष्ठ महाविद्यालयांत प्राध्यापकांची शंभर टक्के भरती करा
कोल्हापूर : वरिष्ठ महाविद्यालयांत प्राध्यापकांची शंभर टक्के भरती करा, पदवीधरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा, आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी तासिका तत्त्वावरील सहायक प्राध्यापकांनी (सीएचबीधारक) निर्दशने केली.
या मागण्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा युनिव्हर्सिटी स्टुडंटस् असोसिएशनने (युएसए) यावेळी दिला. येथील दसरा चौकात युएसएच्या नेतृत्वाखाली सीएचबी प्राध्यापकांनी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा दिल्या.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे, सचिन घोसाळकर, अनिल मिसाळ, मानसी कांबळे, प्राजक्ता आरबुने, धनाजी सकटे, प्रवीण कांबळे, आदी सहभागी झाले.