शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मॅरेथॉनमध्ये नऊवारी साडीत धावण्याचा विक्रम- : २१ किलोमीटरचे अंतर पार करत दिली तरुणींना प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 01:19 IST

तरुणींमध्ये पाश्चात्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना, केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अंतिकाठ (वय ३४) यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करीत महिलांना प्रेरणा

ठळक मुद्देमनाल अंतिकाठ यांचा सहभाग

मिरज : तरुणींमध्ये पाश्चात्य कपड्यांची फॅशन प्रचलित असताना, केरळी कुटुंबातील डॉ. मनाल मोहन अंतिकाठ (वय ३४) यांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करीत महिलांना प्रेरणा देत स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करून दाखवले. नऊवारी साडीत धावण्याची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या डॉ. मनाल पहिल्याच महिला पेसर ठरल्या असून, त्यांचा विक्रम लिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी पाठविण्यात आला आहे.

डॉ. मनाल मिरजेच्या वॉन्लेस हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट व सहायक प्राध्यापक म्हणून काम करतात. वैद्यकीय क्षेत्रासोबतच खेळाचीही त्यांना विशेष आवड असल्याने ‘पिंकाथोन’ या सांगलीतील महिलांच्या ग्रुपमध्ये त्या सहभागी झाल्या. यातूनच त्यांच्या मॅरेथॉनमध्ये धावण्याच्या इच्छेस बळ मिळाले. पिंकाथोन या ग्रुपतर्फे वर्षभर महिलांसाठी धावणे व इतर उपक्रम प्रामुख्याने राबविले जातात. मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी परिश्रमाची आवश्यकता होती. डॉ. मनाल यांनी प्रथम १० किलोमीटर व हळूहळू १५ किलोमीटरचे अंतर पूर्ण करत स्वत:चा आत्मविश्वास वाढविला. बेळगाव येथे पार पडलेली अर्धमॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्या अर्धमॅरेथॉनमध्ये नियमित सहभागी होऊ लागल्या.

मुंबईच्या डॉ. क्रांती साळवे या बर्लिन मॅरेथॉनमध्ये पारंपरिक वेशात ४२ किलोमीटर धावल्याची बातमी त्यांच्यासाठी आदर्श ठरली. सांगलीत शहीद मॅरेथॉनमध्ये डॉ. मनाल यांना एक पेसर म्हणून पारंपरिक नऊवारी साडीत दिलेल्या वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली. दि. २४ फेब्रुवारीरोजी पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये डॉ. मनाल या पारंपरिक नऊवारीमध्ये धावल्या. त्यांनी २१ किलोमीटर स्पर्धा २ तास ५० मिनिटांत पूर्ण केली.नाकात नथ व नऊवारी साडीत धावणाऱ्या डॉ. मनाल यांना पाहून इतर धावपटूंनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या अनोख्या उपक्रमाची प्रशंसाही केली. हल्लीच्या तरुणींना पारंपरिक नऊवारी साडी परिधान करणे अडचणीचे वाटत असताना, डॉ. मनाल यांनी महाराष्ट्रीयन नऊवारी साडी नेसून घेतलेली धाव सर्व महिलांना प्रेरणा देणारी आहे.महावितरण कंपनीत ‘वायर वुमन’चा ठसासांगली : शिपाई, लिपिक, व्यवस्थापक अशा अतांत्रिक पदांबरोबरच महावितरणमध्ये अभियंता व लाइन स्टाफ पदावर रुजू झालेल्या महिला आता खांबावर चढून काम करीत आहेत. पूर्वी पुरुषांची मक्तेदारी असणाºया ‘वायरमन’ या पदाची अतिजोखमीची कामेही महिला करू शकतात, हे या सांगलीच्या रणरागिणींनी (वायर वुमन) दाखवून दिले आहे.

महावितरणने महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले व वीज क्षेत्रातील तांत्रिक काम करण्यासाठी ४७ महिलांना केवळ संधीच दिली नाही, तर त्यांना ‘वायर वुमन’ ही नवी ओळखही दिली आहे. महावितरणने दिलेल्या संधीचे या ‘वायर वुमन’नीही सोने केले आहे. ग्राहकांच्या विजेच्या तक्रारी आल्यास, तात्काळ तेथे जाऊन खांबावर चढून जोडणी व दुरुस्ती करण्याची उत्तम कामगिरी महिला सांभाळत आहेत. वायरमनपेक्षाही वायर वुमनची वीज बिलांची वसुलीही सर्वाधिक आहे. या ‘वायर वुमन’च्या अडचणींची दखल घेण्यासाठी विशेष समिती स्थापना करण्यात आली आहे. वीज क्षेत्रात चुकीला क्षमा नसते, हे माहीत असतानाही शेकडो महिला ‘वायर वुमन’म्हणून महावितरणमध्ये सक्षमपणे काम करत आहेत.

‘महापारेषण’मधील उपकार्यकारी अभियंता ते कनिष्ठ तंत्रज्ञाचे काम तुलनेने कठीण असते. ३३ किलो व्होल्टस्हून अधिक क्षमतेच्या वीज वाहिन्यांच्या देखभालीचे व दुरूस्तीचे काम या कंपनीकडे आहे. येथील कार्यालय दिवस आणि रात्र असे चोवीस तास चालू असते. या कार्यालयाचा कारभार सध्या महिला उत्तमपणे सांभाळत आहेत, असा विश्वास उपकार्यकारी अभियंता रंजिता पाटील-उदगीरकर यांनी व्यक्त केला.महिला बाइकर्स टीमची सांगली परिसरात धूमसांगली : बाईक रॅली, तीही बुलेटवरची आणि तीसुद्धा महिलांची... ही कल्पनाच किती भन्नाट आहे... प्रत्यक्षात रस्त्यावर महिला बाइकर्स उतरल्यानंतर काय धम्माल येईल... सांगलीत अशाच महिलांची टीम तयार होत आहे. तब्बल ४० हून अधिक महिला ‘बाइकर्स क्विन’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. शहरांत महिला बाईक रॅली काढून जनजागृतीचा त्यांचा विचार आहे.बदलत्या काळात महिलांनी कर्तृत्वाच्या विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे. परंपरेने दिलेल्या जबाबदाºया आणि निसर्गाने मातृत्वाच्या वरदानातून दिलेले वात्सल्य यांचा समतोल साधत स्त्री प्रसंगी रणरागिणीही होते. याचा प्रत्यय अनेक घटनांतून समोर आला आहे. कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच महिला करिअरच्या वाटांवरही समर्थ वाटचाल करतात. वाहन चालविणे तसे महिलांना नवे नाही; पण त्यात बुलेटसारखे वाहन चालविण्याचा अनुभवच काही वेगळा असतो. बुलेट चालविणाऱ्यांत पुरुषांचे वर्चस्व आहे; पण आता त्याला छेद दिला आहे, तो सांगलीच्या महिलांनी!पूनम पाठक यांनी महिला बाइकर्स तयार करण्याचा विडा उचलला. त्यात बुलेटची राईड महिलांनी करावी, असा संकल्प केला. दोन वर्षांपूर्वी महिलांनी बुलेट चालविणे तसे नावीन्यपूर्णच होते; पण पाठक यांनी मनात घेत सुरुवातीला मैत्रिणींसमोर संकल्पना मांडली. त्यासाठी दहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले. हळूहळू महिला बुलेट चालविण्यास शिकू लागल्या. पाहता-पाहता हा आकडा ४० वर गेला. काही महिलांच्या घरी बुलेट होत्या; तर काहींकडे नव्हत्या. पाठक यांनी त्यांना बुलेट उपलब्ध करून दिली.

परिस्थितीनेच ‘वायर वुमन’ : पौर्णिमा उराडेरामटेक (जि. नागपूर) येथील मूळ रहिवासी असलेल्या पौर्णिमा उराडे सध्या सुभाषनगर (ता. मिरज) येथे महावितरणकडे वायर वुमन या पदावर कार्यरत आहेत. दहावी आणि बारावी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असूनही पौर्णिमा यांनी आयटीआय शिक्षण पूर्ण करून २०१५ पासून महावितरणकडे वायर वुमनची नोकरी स्वीकारली आहे. गावातील विजेच्या तक्रारी, खांबावर चढून जोडणी व दुरुस्ती करणे आणि वसुलीचे कामही उत्तम पध्दतीने त्या सांभाळत आहेत. शंभर टक्के वीज बिलाची वसुली केली आहे. 

टॅग्स :SangliसांगलीWomen's Day Specialजागतिक महिला दिन