शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:04 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ मिलिमीटर अधिक पाऊस झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर, सांगलीत परतीचा रेकॉर्डब्रेक पाऊसआॅक्टोबरच्या सरासरीपेक्षा ३०० टक्के पर्जन्य : खरिपाचे मोठे नुकसान

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूरसांगली जिल्ह्यांत यंदा मान्सूनकाळात पावसाने धुमाकूळ घातलाच; पण परतीच्या काळातही त्याने सगळ्यांची दैना उडवून दिली. आॅक्टोबर महिन्यात दोन्ही जिल्ह्यांच्या सरासरीच्या ३०० टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२८५ मिलिमीटर अधिक पाऊस झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.पश्चिम महाराष्ट्रात  पावसाचा काहीसा लहरीपणा अनुभवास येतो. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत तालुकानिहाय पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडतो. सातारा व सांगली जिल्ह्यांत दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते; तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड व सातारा जिल्ह्यांतील महाबळेश्वर तालुक्यात जोराचा पाऊस होतो.

साधारणत: सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस परतीच्या मार्गावर लागतो; पण यंदा कोल्हापूर व सांगलीकरांनी निसर्गाचे वेगळे रूप अनुभवले. जुलै व आॅगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने झोडपून काढले. महापुराने येथून पाठीमागचे सर्व रेकॉर्ड मोडत नवीन विक्रम प्रस्थापित केले.

महापुराने शेतीचे कोट्यवधीचे नुकसान तर झालेच; पण अनेक कुटुंबे बेघर झाली. सप्टेंबर महिन्यात पाऊस पाठ सोडील असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले. दसरा व दिवाळी सण पावसात वाहून गेल्यासारखीच परिस्थिती होती.कोल्हापूर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यात ३११० मिलिमीटर म्हणजेच सरासरी २६० मिलिमीटर, तर सांगलीत २६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापुरात सरासरी ५० मिलिमीटर, तर सांगलीत या कालावधीत फारच तुरळक पाऊस होतो. यंदा नोव्हेंबर उजाडला तरी पाऊस पाठ सोडत नसल्याने केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान झाले असे नाही, तर सर्वच घटक अडचणीत आले आहेत.दुष्काळी पट्ट्यातही विक्रमी पाऊससांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ व कडेगाव या दुष्काळी तालुक्यांत आॅक्टोबर महिन्यात अनुक्रमे सरासरी ३१० व १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.आॅक्टोबर महिन्यातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा वर्ष               कोल्हापूर    सांगली२०१६             ३५१           ११२०१७            १५६१          १२९२०१८             ५६३            ४०२०१९           ३११०           २३९८आॅक्टोबर महिन्यातील तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-

  • कोल्हापूर- हातकणंगले (२२१), शिरोळ (१९८), पन्हाळा (२९४), शाहूवाडी (२९०), राधानगरी (२४९), गगनबावडा (२८३), करवीर (२७२), कागल (२८२), गडहिंग्लज (२६७), भुदरगड (२०७), आजरा (२९५), चंदगड (२५२).
  • सांगली - इस्लामपूर (१७१), पलूस (२०३), तासगाव (२४५), शिराळा (२२५), मिरज (२५६), विटा (२५१), आटपाडी (२७५), कवठेमहांकाळ (३१०), जत (२९८), कडेगाव (१६७).

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूरSangliसांगली