संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

By विश्वास पाटील | Updated: August 2, 2022 18:48 IST2022-08-02T18:39:15+5:302022-08-02T18:48:13+5:30

कागल तालुक्यातून एक लाख सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करू असा शब्दही घाटगे यांनी यावेळी दिला.

Rebel MP Sanjay Mandalik tension will increase? Shiv Sena registers 15 thousand members from Kagal taluka kolhapur | संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

संजय मंडलिकांचे टेन्शन वाढणार?, अंबरिश घाटगे लागले कामाला; आदित्यही खुश

कोल्हापूर : शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले खासदार संजय मंडलिक यांचे होम ग्राऊंड असलेल्या कागल तालुक्यातून गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिश घाटगे यांनी शिवसेनेची नव्याने १५ हजार सभासद नोंदणी केली. अन् सभासद नोंदणी असलेली यादीच आज, मंगळवारी पक्ष नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केली. या तालुक्यातून आम्ही एक लाख सभासद नोंदणीचा टप्पा पूर्ण करू असा शब्दही घाटगे यांनी यावेळी दिला.

घाटगे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह सकाळी येथील हॉटेलमध्ये आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, धनराज घाटगे उपस्थित होते. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्याने सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नोंदणीची मोहिम राज्यभर सुरु आहे.

कागल तालुक्यातून नोंदणीस मिळालेला प्रतिसाद पाहून आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला. ज्यांना आम्ही शिवसेनेची दोनवेळा उमेदवारी दिली, खासदार केले. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. परंतू तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने सभासद नोंदणी केल्याबद्दल तुमचे अभिनंदन व माजी आमदार संजय घाटगे यांना धन्यवाद सांगा अशा भावना ठाकरे यांनी या भेटीवेळी व्यक्त केल्या.

Web Title: Rebel MP Sanjay Mandalik tension will increase? Shiv Sena registers 15 thousand members from Kagal taluka kolhapur