हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे निधन मान्यवरांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:54+5:302020-12-15T04:40:54+5:30
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत खंचनाळे आण्णांनी कुस्ती जोपासण्याचे काम केले. कुस्तीसाठी संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांच्या जाण्याने नि:स्सीम कुस्तीप्रेमी आपण गमावला. ...

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे निधन मान्यवरांच्या प्रतिक्रिया
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत खंचनाळे आण्णांनी कुस्ती जोपासण्याचे काम केले. कुस्तीसाठी संपूर्ण आयुष्य वाहिले. त्यांच्या जाण्याने नि:स्सीम कुस्तीप्रेमी आपण गमावला.
- व्ही. बी. पाटील, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
प्रतिक्रीया
कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही. त्यामुळेच दोन दिवसांची कुस्ती करून या पठ्ठ्याने ‘पहिला हिंदकेसरी किताब’ कोल्हापूरला खेचून आणला. कडवी झुंज हाच आदर्श आजच्या पिढीतील कुस्तीगीरांनी घेतला तर त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
- बाळ गायकवाड, मार्गदर्शक, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
प्रतिक्रीया
अपार मेहनती व कौशल्याच्या जोरावर त्यांनी हिंदकेसरीचा पहिला बहुमान मिळविला. अनेक मल्लांना त्याचा प्रवास प्रेरणा देणारा आहे. कुस्ती थांबविल्यानंतरही शाहुपूरी तालमीत अनेक मल्ल घडविण्याचे काम त्यांनी निरंतर ठेवले.
- ॲड. महादेवराव आडगुळे, सरचिटणीस, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
प्रतिक्रीया
कडवी झुंज कशी द्यायची याचे डावपेच केवळ श्रीपती आण्णांकडेच होते. त्यांनी माझ्यावर धाकट्या भावाप्रमाणे प्रेम केले. माझे बंधू महमद हनिफ व आण्णांमुळेच आजही मी शाहूपुरी तालमीत चांगला पैलवान घडविण्याचे काम करत आहे.
-रसूल हनिफ, वस्ताद, शाहूपुरी तालीम
प्रतिक्रीया
दिग्गजांना घडविले
कुस्ती स्वत:भोवती न ठेवता शाहूपुरी तालमीत कडवे पैलवान त्यांनी तयार केले. त्यात माझ्यासारख्या पैलवानांचाही समावेश होता. व्यायाम, आहार याच्यावर त्यांचा विशेष कटाक्ष होता.
- धनंजय महाडिक, माजी खासदार
चौकट
अन् पहिली सभा निर्भिडपणे पार पडली
शेतकरी नेते शरद जोशी यांची कोल्हापुरातील गांधी मैदानात १९८८ साली पहिली सभा झाली. त्या दरम्यान अनेक दिग्गजांनी प्रस्थापितांनी सभाच होऊ न देण्याचा चंग बांधला होता. त्यावेळी हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे दादा संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले. व्यासपीठावर ते असल्यामुळे लाखापेक्षा अधिकचा जनसमुदाय असलेल्या सभेत गोंधळ घालण्याचे धाडस कोणाचे झाले नाही. त्यांच्यासारखा कुस्ती दिग्गज होणे अशक्य आहे.
- राजू शेट्टी, माजी खासदार व अध्यक्ष. स्वाभिमानी शेतकरी संघटना