शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील बीडमध्ये सोन्याच्या पावसाचा पुनःश्च प्रत्यय, शेतात काम करताना महिलेस सापडली सुवर्णमुद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 18:15 IST

एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचुन राहत नाही

शिवाजीराव लोंढे

कसबा बीड : कसबा बीड ता. करवीर येथील कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतो ही अख्यायिका गेल्या अनेक शतकांपासुन प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येत असतो. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजुनही सापडत आहेत.स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना बेडा असे संबोधले जाते. ७ मे रोजी कसबा बीड गावच्या ग्रामस्थ सुनिता रमेश कुरणे यांना एक बेडा सापडला आहे. महारकी परिसरातील संतोष वरूटे यांच्या शेतात काम करत असता त्यांना हा बेडा सापडला. सदर बेडा ७ मिमीचा असुन याचे वजन ०.७८ ग्रॅम इतके आहे. यावर अस्पष्ट फुलछाप अंकण दिसते.मागील दोन वर्षात कसबा बीड गावात सोने सापडण्याचा प्रकार बऱ्याच वेळा घडुन आला आहे. या वर्षातील ही दुसरी घटना आहे. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचुन राहत नाही. गावात सापडणारे असे हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभावाची जणू साक्ष देत आहेत.आजही कसबा बीडमध्ये अशा बेड्यांना दैवी आशिर्वादाच्या स्वरूपात पुजले जाते. कसबा बीडच्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्णराजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंRainपाऊस