शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

भुदरगडमधील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी फेरआरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 12:02 IST

collecator kolhapur- संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फणसवाडी ता. भुदरगड या ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सोडतीवरील हरकत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आता फणसवाडी भुदरगडमधील आरक्षण जाहीर झालेल्या ६० पैकी महिला आरक्षण पडलेल्या ३० ग्रामपंचायतींचे आरक्षण नव्याने काढले जाणार आहे. तब्बल दोन दिवसांच्या सुनावणीनंतर बुधवारी रात्री हा निकाल देण्यात आला.

ठळक मुद्देभुदरगडमधील ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी फेरआरक्षणतब्बल दोन दिवसांच्या सुनावणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल:

कोल्हापूर: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फणसवाडी ता. भुदरगड या ग्रामपंचायतीच्या सरपंचपद सोडतीवरील हरकत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आता फणसवाडी भुदरगडमधील आरक्षण जाहीर झालेल्या ६० पैकी महिला आरक्षण पडलेल्या ३० ग्रामपंचायतींचे आरक्षण नव्याने काढले जाणार आहे. तब्बल दोन दिवसांच्या सुनावणीनंतर बुधवारी रात्री हा निकाल देण्यात आला.सरपंच पदाचे जाहीर झालेले आरक्षण बदलण्याची ही जिल्ह्यातील आजवरची पहिलीच घटना ठरली आहे. आरक्षण काढताना नेहमी रोटेशन पद्धतीचा अवलंब होतो, यावेळी तो झाला, पण यावेळी तहसीलदार पातळीवर यात घोळ घातला असल्याचे सांगत जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींनी उच्च न्यायालयात धाव घेतली.न्यायालयाने याचिका दाखल करून घेताना जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन निवाडा करावा असे सूचित केले होते. त्यानुसार गेले चार दिवस जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर तक्रारदार गावे, याचिकाकर्ते वकील यांच्यासह सुनावणी झाली.शिरोळ तालुक्यातील तमदलगे आणि भुदरगड तालुक्यातील ही दोन गावे वगळून बाकीच्या ७ गावांच्या याचिका फेटाळून लावत आरक्षण जैसे थे ठेवले. तमदलगेच्या सुनावणीवेळी मंगळवारी चिठ्ठ्या टाकून गुंता सोडवण्याच्या प्रयत्न झाला, पण अंतिम निकाल राखून ठेवण्यात आला.याचिकाकर्ते ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देसाई यांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला होता. याचिकाकर्त्याचे म्हणणे ग्राह्य मानत बुधवारी फणसवाडीत फेरआरक्षण काढण्याचा निकाल जिल्हाधिकारी देसाई यांनी तहसीलदार यांना दिला.निम्मे आरक्षण बदलणारएक आरक्षण बदलल्यामुळे आता तालुक्यातील ६९ पैकी महिला आरक्षण पडलेल्या ३० आरक्षणाच्या सोडती नव्याने काढल्या जाणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या ३० गावांमध्ये नवी प्रक्रिया राबवावी लागणार आहे, नव्याने राजकीय जोडण्या कराव्या लागणार असल्याने वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.फणसवाडीत सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण पडले होते, ते रद्द करावे अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.शिरोळ तालुक्यातील तमदलगे आरक्षण सोडतीवरील सुनावणी पूर्ण झाली आहे, पण निकाल राखून ठेवण्यात आला आहे. चिठ्ठीमध्येही आरक्षण जैसे थे राहिले आहे, तर निमशिरगावच्या आरक्षणात बदल झाला असल्याचे समजते, पण अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी