कोल्हापूर : सुधारित अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील १,०२६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सोमवारी (दि.२१) तिसऱ्यांदा फेरआरक्षण काढण्यात येणार आहे. यापूर्वी ओबीसी गटातील वाढलेल्या चार जागांसाठीच चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचेआरक्षण काढले होते; पण शासनाच्या निर्देशाप्रमाणे अधिसूचनेत बदल झाल्याने आधीची अधिसूचना रद्द झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील आरक्षण काढले जाणार असून, त्यामुळे चिठ्ठ्या टाकून काढले गेलेले आरक्षणच बदलणार आहे. गावातील राजकीय समीकरणेही बदलणार असून, इच्छुक पुन्हा गॅसवर गेले आहेत.राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षण या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील करवीर, आजरा, शाहूवाडी व राधानगरी या चार तालुक्यांमधील सर्वसाधारण गटातील सरपंचपदाचे आरक्षण प्रत्येकी एक जागा कमी होऊन नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये वाढविण्यात आली होती. त्यानुसार २६ जूनला या चार तालुक्यांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. मात्र, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागाने सर्वच तालुक्यांना नव्याने ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सूचना पाठवली आहे. यानुसार जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १,०२६ गावांमधील सरपंचपदाचे आरक्षण २१ तारखेला नव्याने काढले जाणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे शासनाने पूर्वी काढलेल्या अधिसूचनेत बदल केले गेले. त्यामुळे मूळ अधिसूचना रद्द करून ७ जुलै रोजीच्या मार्गदर्शनपत्रानुसार नव्याने सरपंच आरक्षण काढावे लागणार आहे. मात्र, १३ जूनच्या अधिसूचनेनुसार सरपंच आरक्षणात बदल होणार नसला, तर ज्याठिकाणी चिठ्ठ्या टाकून सरपंच आरक्षण काढण्यात आले आहे, तेथे मात्र आरक्षण बदलणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालये, पंचायत समिती सभागृहांमध्ये दुपारी १२:३० वाजता आरक्षण साेडत काढण्यात येणार आहे.
आरक्षित प्रवर्ग : संख्या
- अनुसूचित जाती : १३८ (६९ महिला)
- अनुसूचित जमाती ७ (४ महिला)
- नागरिकांचा मागास प्रवर्ग : २७७ (१३९ महिला)
- सर्वसाधारण : ६०४ (३०२ महिला)
तालुका : ग्रामपंचायती : अनुसूचित जाती : अनुसूचित जमाती : मागास प्रवर्ग : सर्वसाधारणपन्हाळा : १११ : १६ : ० : ३० : ६५शाहूवाडी : १०६ : १३ : १ : २९ : ६३करवीर : ११८ : १९ : १ : ३२ : ६६गगनबावडा : २९ : ५ : ० : ८ : १६कागल : ८३ : १२ : ० : २२ : ४९राधानगरी : ९८ : ११ : ० : २७ : ६०हातकणंगले : ६१ : १२ : १ : १६ : ३२शिरोळ : ५२ : १० : २ : १४ : २६आजरा : ७३ : ८ : ० : २० : ४५भुदरगड : ९७ : ११ : ० : २६ : ६०गडहिंग्लज : ८९ : १० : १ : २४ : ५४चंदगड : १०९ : ११ : १ : २९ : ६८एकूण : १०२६ : १३८ : ७ : २७७ : ६०४
शासन निर्देशानुसार आधीच्या अधिसूचनेत बदल झाल्याने मूळ अधिसूचना रद्द झाली आहे. त्यामुळे नव्या अधिसूचनेनुसार सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण काढले जाईल. - डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी महसूल