‘गोकुळ’च्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST2021-02-13T04:23:57+5:302021-02-13T04:23:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार ...

Re-hearing on Gokul's double resolutions | ‘गोकुळ’च्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी

‘गोकुळ’च्या दुबार ठरावांवर पुन्हा सुनावणी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) प्रारूप यादी सोमवारी (दि. १५) प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावावर यापूर्वी सुनावणी होऊन निकालही दिला होता. मात्र, दुबार ठरवासह प्रारूप याद्यांवर येणाऱ्या हरकतीवर विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

‘गोकुळ’साठी १५ डिसेंबर २०१९ रोजी संस्था प्रतिनिधींच्या नावाचे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. २२ जानेवारी २०२० अखेर ३७६४ ठराव दाखल झाले होते. प्रत्येक्षात संस्थांपेक्षा १०५ ठराव जादा दाखल झाले होते. या दुबार ठरावांवर सहायक निबंधक (दुग्ध) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे सुनावणी पूर्ण झाली. यामध्ये सुनावणीदरम्यानच सात संस्थांमध्ये समझोता झाला होता. उर्वरित ठिकाणी अध्यक्ष, सचिव एकीकडे तर संचालक दुसरीकडे असे चित्र होते. तर काही संस्थांमध्ये दोन सचिवांबरोबर दोन प्रोसेडिंग असल्याचे पेच निर्माण झाला होता. त्यावर सुनावणी होऊन ३६५९ प्रतिनिधींची नावे निश्चित केली होती. ही प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती, तोपर्यंत निवडणकांची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली.

आता नव्याने प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारी प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. दुबार ठरावांचा समावेशही या यादीत राहणार असून दुबार ठरावांसह प्रारूप यादीवर येणाऱ्या हरकत घेता येणार आहे.

तालुका दुबार ठराव संख्या

आजरा ४

करवीर १३

कागल ७

गगनबावडा १

गडहिंग्लज ११

पन्हाळा १७

भुदरगड १८

राधानगरी २७

शाहूवाडी ४

हातकणंगले १

Web Title: Re-hearing on Gokul's double resolutions