शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

टंकलेखन चाचणीची येत्या बुधवारी फेरपरीक्षा; सॉफ्टवेअरमध्ये, निकषात कोणताही बदल नाही 

By संदीप आडनाईक | Updated: May 29, 2023 12:55 IST

सराव चाचणी घेण्याची सूचना 

संदीप आडनाईक

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षेतील तांत्रिक अडथळ्यानंतरही स्वत:वर जबाबदारी न घेता त्याचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत आयोगाने या चाचणीची फेरपरीक्षा बुधवारी (दि. ३१ मे) आयोजित केली आहे. आयोगाने सॉफ्टवेअरमध्ये, तसेच निकषातही कोणताही बदल न करता स्वत:वरची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच टाकलेली आहे.

आयोगाच्या दक्षता, धोरण व संशोधन विभागाच्या सहसचिवांनी २४ मे रोजी काढलेल्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता दि. ७ एप्रिल २०२३ रोजी मुंबईत घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची मुंबईत नव्याने ३१ मे रोजी सकाळी ८:३० ते ९ या वेळेत इंग्रजी माध्यमासाठी, तर ११ ते ११:३०, दुपारी १:३० ते २, दुपारी ४ ते ४:३० आणि सायंकाळी ६:३० ते ७ या वेळेत मराठी माध्यमासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित केली आहे. मात्र, ज्या कारणासाठी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे सॉफ्टवेअर आणि निकषात बदल केलेले नाहीत. मग ही परीक्षा पुन्हा कशासाठी घेत आहेत, असा सवाल उमेदवार विचारत आहेत.की-बोर्ड त्रुटी, मशीन ऑटो लॉक, वीज व्यत्यय, स्वयंचलितरीत्या चाचणीमधून बाहेर पडल्याच्या कोणत्याही त्रुटी आढळल्यास समवेक्षकाशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास पुन्हा लॉगइन करण्याची मुभा दिली असली तरी ७ मार्चला झालेल्या त्रुटीनंतरही पुन्हा टंकलेखनाचा उतारा मर्यादा मराठीसाठी ३०० शब्द आणि इंग्रजीसाठी ४०० शब्दांचाच ठेवला आहे. यासाठी की-बोर्ड चाचणी, ब्रेक, मॉक, ब्रेक, मराठी टंकलेखन यासाठी ३२ मिनिटांचाच वेळ दिला आहे.सराव चाचणी घेण्याच्या सूचना मराठीसाठी की-बोर्ड ले-आउटही रेमिंग्टन मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजी यूएस असा बोर्ड ठेवला आहे. यावेळी की-बोर्डमध्ये तांत्रिक बिघाड नसतानाही उमेदवाराने की-बोर्ड बदलून देण्याचा आग्रह धरल्यास कारवाई करण्याची धमकीही आयोगाने दिली आहे. यासाठी चाचणी सुरू होण्यापूर्वी सराव चाचणी घेण्याच्याही सूचना केल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtypewriterटाइपरायटरexamपरीक्षा