राशिवडे सरपंचांना लोकवर्गणीतून मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST2020-12-13T04:38:16+5:302020-12-13T04:38:16+5:30

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्ये यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र प्रदान करण्यात ...

Rashiwade Sarpanch gets a motorcycle from the crowd | राशिवडे सरपंचांना लोकवर्गणीतून मोटारसायकल

राशिवडे सरपंचांना लोकवर्गणीतून मोटारसायकल

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेट्ये यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पत्रकार, आशा, अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, पोलीस मित्र यांना ‘कोरोना योद्धा’ मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास उपसरपंच अनिल वाडकर, डॉ. जे. जी. पाटील, मोहन धुंदरे, संजय डकरे, राजेंद्र पाटील, प्रकाश धुंदरे, संतोष पाटील, सुदर्शन कापसे, तलाठी सुनील खेडकर, पोलीस पाटील उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजाराम कांबळे, शिवाजी चौगले, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील यांनी आभार मानले. १२ राशिवडे सत्कार

फोटो ओळी :

सरपंच कृष्णात पोवार यांना मोटारसायकल भेट देताना जि. प. सदस्य विनय पाटील, अविनाश पाटील, उपसरपंच अनिल वाडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Rashiwade Sarpanch gets a motorcycle from the crowd