शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:51 IST

WildLife Gaganbawad Kolhapur :  गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशी प्राण्याची भर पडली आहे.पदभ्रंमती दरम्यान चामेलियो झेलेनिनिकस या दुर्मिळ किटक प्रजातीचा सरडा आढळला.

ठळक मुद्देगगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडाचामेलियो झेलेनिनिकस दुर्मीळ प्रजातीचा सरडा

श्रीकांत ऱ्हायकरधामोड :  गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशी प्राण्याची भर पडली आहे.पदभ्रंमती दरम्यान चामेलियो झेलेनिनिकस या दुर्मिळ किटक प्रजातीचा सरडा आढळला.

अनेकविध दुर्मीळ पशू, पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी या तालुक्यातील वनसंपदा पोषक ठरते आहे. थंडगार हवा, घनदाट झाडी, तुरळक मानवी वस्ती यामुळे येथे विविध प्राणी , पक्षी , किटक यांचा अधिवास अढळतो. विविध देशामधे अधिवासासाठी परिचीत असणारे पक्षी, प्राणी या तालुक्याच्या निसर्गरम्य परिसरात अढळत असतात. ही या तालुक्याचा निसर्ग संपदेत भर टाकणारी एक दिलासादायक बाब आहे.हा भारतीय रंगीत सरडा म्हणूनही ओळखला जातो. याला शास्त्रीय भाषेत चामेलियो झेलेनिनिकस या नावाने ओळखले जाते. हा सरडा विशेषतः श्रीलंका,  भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागात आढळणार्‍या सरड्याची एक प्रजाती आहे. इतर सारड्याप्रमाणेच या प्रजातीची जीभ लांब असते. व पायांला दोनच बोटे असतात. त्यांचा आकार चिमट्यासारखा असतो. तो आपल्या शेपटीने फांदीला पकडू शकतो, अशा विशिष्ठ पध्दतीची त्याच्या शेपटीची रचना असते . त्याला इंग्लिशमध्ये (Prehensile Tail) असे म्हणतात . डोळ्यांची स्वतंत्र हालचाल आणि त्वचेचा रंग बदलण्याची क्षमता या सरड्यामध्ये असते. तो आपले डोळ वर ,खाली करत डुलत हळुवारपणे चालतो .हा सरडा जास्तीत जास्त वेळ झाडावरच असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते पार्श्वभूमी रंग निवडत नाहीत. ते सरडे सहसा हिरव्या किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असलेले अढळतात. हा सरडा आपला रंग वेगाने बदलू शकतो . या सरडयाचे रंग बदलण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे इतर सरड्याशी संवाद साधणे आणि उष्णता शोषण्यासाठी गडद रंगात बदलून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे असते . या सरडयाची नाकापासून शेपटीच्या सुरुवाती पर्यंतची लांबी ७ इंच तर शेपूट ८ इंचाची असते .गगनबावडा तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पदभ्रमंती दरम्यान येथील नायब तहसीलदार संजय वळवी, महसूल सहाय्यक विजय पारधी, अवधूत खापणे यांना हा सरडा आढळून आला.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर