शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मधुकर बाचूळकर लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 19:26 IST

लोकमतच्या शहर कार्यालयात डॉ. बाचूळकर व डॉ. अशोक वाली लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देदुर्मीळ देशी वनस्पतींचे संवर्धन व्हावे  : मधुकर बाचूळकर

कोल्हापूर : महाराष्ट्रात औषधी तसेच वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असलेली दुर्मीळ देशी वृक्षसंपदा आहे. मात्र आधुनिक कल म्हणून परदेशी झाडे लावली जातात, ज्यांचा निसर्गाला आणि माणसांनाही काही फायदा नसतो. त्यामुळे प्रत्येकाने जागरूकपणे आपल्या दारात, बागेत देशी वनस्पती लावून त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ वनस्पतिशास्त्र तज्ज्ञ प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.लोकमतच्या शहर कार्यालयात डॉ. बाचूळकर व डॉ. अशोक वाली लिखित महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव या पुस्तकाचे प्रकाशन संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

लोकमतमध्ये डॉ. बाचूळकर यांची लेखमाला कोल्हापूरची वृक्षसंपदा या सदराखाली दीड वर्ष प्रसिद्ध होत होती. ती अधिक माहिती व छायाचित्रांसह या पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.ते म्हणाले, एक संशोधक म्हणून अभ्यास करताना कोल्हापुरातील औषधांसह विविध गुणधर्म असलेल्या वृक्षसंपदेचे ज्ञान मिळत गेले. शोधनिबंधातून हे ज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिले पाहिजे याची जाणीव झाली आणि ते नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून लोकमतने यात महत्त्वाची भूमिका निभावली. यामुळे लोक अधिक जागरूक झाले. लोकमतने प्रसिद्ध केलेले सह्याद्रीचा वारसा हे एकमेव मराठी पुस्तक आहे. यातूनच निसर्गाबद्दलची जागरूकता कळते.वसंत भोसले म्हणाले, जगभरात कोरोनाने केलेल्या उद्रेकानंतर निसर्गाचा ऱ्हास, वृक्षतोड, पाणी-वायू प्रदूषण, विकासाच्या चुकीच्या संकल्पना, बदलती जीवनशैली यांबाबत गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेले हे पुस्तक सगळ्यांनाच मार्गदर्शक ठरेल.

लोकमतमध्ये विविध लेखकांच्या प्रसिद्ध झालेल्या सदरांचे हे नववे पुस्तक आहे. निसर्गावरील संशोधनातून बाचूळकर यांनी महाराष्ट्र आणि देशासाठीही मोठे काम केले आहे. लोकमत चांगल्या व्यक्तींच्या मागे नेहमी खंबीरपणे उभे राहील. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लोकमतमधील विविध विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूरliteratureसाहित्य