शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात राष्ट्रीय नेमबाजासह सहा जणांवर रापीने हल्ला, संशयितास जमावाची बेदम मारहाण

By सचिन भोसले | Updated: October 26, 2023 17:26 IST

कोल्हापूर : दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंमध्ये उसने पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून शिवीगाळ व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून ...

कोल्हापूर : दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंमध्ये उसने पैसे देवाण-घेवाणीच्या वादातून शिवीगाळ व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून युवकास मारण्याचा प्रयत्न व अन्य चार जणांवर रापीने हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी इम्तियाज गुलाब मुजावर (वय ४७) व त्यांचा अल्पवयीन मुलगा (दोघेही रा. जुना मोटार स्टँड, निपाणी,ता. चिकोडी, बेळगाव) या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद समर्थ रणजित मंडलिक, (वय १९ रा. लाड चौक, नाथागोळे तालीम, शिवाजी पेठ) याने दिली.पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, फिर्यादीसह अन्य चार खेळाडू व संशयित अल्पवयीन मुलगा हा दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रात नेमबाजीचा सराव करतात. या ठिकाणी संशयित व फिर्यादी यांच्यात पैसे देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. हा वाद रविवारी मिटवण्यात आला होता. मात्र, गुरुवारी दुपारी संशयित अल्पवयीन मुलाचे वडील पुन्हा या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी समर्थ यास केबलने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर अल्पवयीन मुलाने प्लास्टिक पाइपच्या तुकड्याने मारहाण केली. दरम्यान संशयित इम्तियाजने चप्पल कट करण्याच्या रापीने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करून जखमी केली. या दरम्यान संशयित इम्तियाजने फिर्यादीच्या वडिलांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डाव्या डोळ्यावरील भुवयांवर, गालावर रापी मारून जखमी केले. भांडणे साेडविण्याकरिता आलेल्या प्रणव पोवार याच्या डावे काखेत व उजव्या हाताला, तर इंद्रजित पाटील याचे डाव्या हाताला व पायाला कुबेर कदम याचे मांडीला मारहाण करून जखमी केले.फिर्यादी समर्थच्या गळ्यातील सोन्याची साखळी तोडून नुकसान केले,असे फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्याचे काम संशयितांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा तपास वैशाली पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस