बलात्कारातील पीडित महिलेने मागितली साठ लाख रुपयांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST2020-12-16T04:39:48+5:302020-12-16T04:39:48+5:30

इचलकरंजी : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदार महिलेने ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी संबंधित महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी ...

Rape victim demands Rs 60 lakh ransom | बलात्कारातील पीडित महिलेने मागितली साठ लाख रुपयांची खंडणी

बलात्कारातील पीडित महिलेने मागितली साठ लाख रुपयांची खंडणी

इचलकरंजी : बलात्काराच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तक्रारदार महिलेने ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी संबंधित महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. याबाबतची तक्रार रशीद बाळासाहेब मुजावर (वय ३७, रा. लिंबू चौक) यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला व रशीद यांची सन २०१६ पासून ओळख आहे. रशीद यांच्याविरोधात त्या महिलेने सन २०१८ साली बलात्काराची तक्रार दिली होती. हा गुन्हा मागे घेण्यासाठी रशीद यांच्याकडून वेळोवेळी नऊ लाख १६ हजार रुपये घेतले; परंतु पुन्हा त्यांच्यावर त्याच महिलेने सदलगा (कर्नाटक) येथे बलात्काराची तक्रार दिली. तो खटला कर्नाटकातील न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये जामीन मंजूर होऊ द्यायचा असेल, तर साठ लाख रुपये देण्याची मागणी रशीद यांच्याकडे संबंधित महिलेने केली. हा खंडणी मागण्याचा प्रकार १३ नोव्हेंबर २०२० ला घडला.

दरम्यान, त्या महिलेने रशीद यांच्या घरात घुसून नातेवाइकांना शिवीगाळ करून पत्नीस मारहाण केली. तसेच कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवीन. त्यामुळे ताबडतोब एक लाख रुपये दे; अन्यथा तुझ्या घरातच आत्महत्या करीन, अशी धमकी सोमवार (दि. १४) पर्यंत देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Rape victim demands Rs 60 lakh ransom