शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा

By उद्धव गोडसे | Published: May 16, 2023 4:45 PM

२०१७ मध्ये घडला होता गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ओळख वाढवून अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी गौरव सतीश कांबळे (वय २७, रा. पोस्ट ऑफिसजवळ, रमणमळा, कोल्हापूर) याला १० वर्षे सक्त मजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत शिक्षा सुनावली. हा गुन्हा फेब्रुवारी ते मार्च २०१७ मध्ये घडला होता.

सरकारी वकील अस्मिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव कांबळे याने फेब्रुवारी ते मार्च २०१७ मध्ये पीडित अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घरात कोणाला सांगितल्यास आई, वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी साडेतीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. देशमुख यांनी तपास करून कांबळे याच्यावर आरोपपत्र दाखल केले.

ॲड. कुलकर्णी यांनी कोर्टात आठ साक्षी तपासल्या. पीडित मुलगी, तिची आई यासह अन्य साक्षी, तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी आरोपीस दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून सुरेश परीट आणि माधवी संजय घोडके यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगCourtन्यायालय