शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

kolhapur: हातकणंगले लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी, हसन मुश्रीफांनी सुचवले 'यांचे' नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:23 IST

हा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाटेला जातो हे निश्चित नसले तरी, राष्ट्रवादीकडून हातकणंगलेसाठी हे एकमेव नाव पुढे आले

आर डी पाटीलबांबवडे (कोल्हापूर): हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव  पुढे आले आहे. मुंबई येथे पार पडलेल्या प्रदेश कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत गायकवाड यांच्या नावाबाबत चर्चा झाली. हा मतदार संघ महाविकास आघाडीत कोणाच्या वाटेला जातो हे निश्चित नसले तरी, राष्ट्रवादीकडून हातकणंगलेसाठी हे एकमेव नाव पुढे आले आहे.मुंबई येथे राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीची व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातून माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के पी पाटील, जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते .यामध्ये हातकणंगले मतदारसंघासाठी रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव हसन मुश्रीफ यांनी सुचवले आहे.सध्याची राजकीय स्थिती पाहता महाविकास आघाडीची मोट चांगल्या पद्धतीने बांधल्यास, विद्यमान खासदारांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. शाहूवाडी- पन्हाळ्यातून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच संयुक्त गायकवाड गट मोठे मताधिक्य देऊ शकतात. हातकणंगलेतून आमदार राजू बाबा आवळे, शिरोळमधून ठाकरे गटाचे उल्हास पाटील, यांची ताकद मिळू शकते, तसेच इचलकरंजी मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाची, काँग्रेसची मदत बऱ्यापैकी होऊ शकते. वाळव्यातून स्वतः प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तर शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे मोठे मताधिक्य देऊ शकतात.रणवीर गायकवाड यांच्या मागे मोठा राजकीय वारसा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात चार दशकाहून अधिक काळ  स्वतःचा दबदबा निर्माण करणारे आजोबा, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड हे पाच वेळा खासदार व तीन वेळा आमदार राहिले आहेत. तसेच मंत्री पदही भूषवले होते. त्यामुळे त्यांना मारणारा अजूनही जुना वर्ग असून याचा फायदा होऊ शकतो. वडिल जिल्हा बँकेचे संचालक तसेच उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले असून सध्या ते प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर आई शैलेजादेवी जिल्हा परिषदेत दोन वेळ सदस्य म्हणून होत्या. त्यापैकी एक वेळ त्यांनी महिला व बालकल्याण सभापतीचा चांगला कार्यकाळ पूर्ण केला आहे. राजकीय वारशा बरोबरच जिल्ह्यातील नेत्यासह त्यांचे चांगले संबंध, राज्यातील नेत्यांच्या बरोबरही आहेत. त्याचा फायदा ते लोकांची कामे करण्यासाठी करतात .तरुणापासून अबाल वृद्धांना सामावून घेऊन सर्वांच्या बरोबर जाणारा एक युवक अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे जर लोकसभेसाठी यांचे नाव निश्चित झाले तर विद्यमान खासदारांच्या पुढे ते मोठे आव्हान देऊ शकतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेस