रंकाळा - आरे बस उद्यापासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST2021-01-03T04:25:54+5:302021-01-03T04:25:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : कोराेनाच्या संकटामुळे गेले दहा महिने रंकाळा - आरे एस. टी. ...

रंकाळा - आरे बस उद्यापासून सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : कोराेनाच्या संकटामुळे गेले दहा महिने रंकाळा - आरे एस. टी. बस बंद असल्याने करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत होते. अन्य प्रवाशांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ग्रामस्थांची समस्या मांडली. त्याची दखल घेत उद्या, सोमवारपासून रंकाळा - आरे बससेवा पूर्ववत करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.
रंकाळा - आरे ही एस.टी.बस सेवा गेले दहा महिने बंद होती. शाळा, कॉलेज तसेच अन्य कामे सुरू झाल्याने जनजीवन पूर्वपदावर आले आहे; पंरतु करवीरच्या पश्चिम भागातील रंकाळा - आरे ही एस.टी. बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत होते.
संभाजीनगर आगाराचे आगारप्रमुख सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता रंकाळा - आरेसाठी पहिल्या टप्प्यात सात फेऱ्या सुरू करण्यास मान्यता मिळाली असून, प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यास फेऱ्या वाढविण्यात येतील. तरी प्रवाशांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.