रामप्रताप झंवर अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:33+5:302021-06-16T04:34:33+5:30

फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे सोमवारी (दि. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन ...

Rampratap Zanwar merges into infinity | रामप्रताप झंवर अनंतात विलीन

रामप्रताप झंवर अनंतात विलीन

फौंड्री उद्योगातील भीष्माचार्य, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांचे सोमवारी (दि. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले होते.

झंवर यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी नऊ वाजता शिवाजी पार्क येथील निवासस्थानी येथून फुलांनी सजविलेल्या गाडीतून आणण्यात आले. सकाळी दहाच्या सुमारास शिरोली एमआयडीसीमधील श्रीराम फौंड्री येथे पार्थिव दर्शनासाठी आणले होते. येथे कामगार आणि उद्योजकांनी झंवर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

साडेअकराच्या सुमारास कसबा बावडा येथील स्मशानभूमीत झंवर यांच्या पार्थिवाला मुलगा नरेंद्र झंवर यांनी भडाग्नी दिला. यावेळी नातू नीरज झंवर, रोहन झंवर, नितीन झंवर, स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील, उद्योजक राजू पाटील, सचिन पाटील, शिरीष सप्रे, शरद तोतला, जयदीप चौगले, कागल असोसिएशनचे गोरख माळी, भीमराव खाडे, अनुप पाटील, अमोल पाटील, दीपक चरणे, रवी पाटील, समीर पाटील यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

चौकट : आज रक्षाविसर्जन

आज, बुधवारी सकाळी आठ वाजता रक्षाविसर्जन, तर दुपारी चार वाजता उठमणू कार्यक्रम आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक विधी घरातच करण्यात येणार आहेत; त्यामुळे कोणीही भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन झंवर परिवाराकडून करण्यात आले आहे.

Web Title: Rampratap Zanwar merges into infinity