दूधसाखर महाविद्यालयात रामानुजन जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:37+5:302020-12-24T04:21:37+5:30
बोरवडे : थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणिताचे ज्ञान आजही आव्हानात्मक आहे. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची भारताबरोबर सर्व जगाला ...

दूधसाखर महाविद्यालयात रामानुजन जयंती
बोरवडे : थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणिताचे ज्ञान आजही आव्हानात्मक आहे. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची भारताबरोबर सर्व जगाला भुरळ पडली आहे. ते जागतिक दर्जाचे गणिततज्ज्ञ होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील दूधसाखर महाविद्यालयात गणित विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय गणित दिन व श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. एस. ए. साळोखे, डॉ. एच. डी. धायगुडे, डॉ. एस. के. सावंत व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन गणित विभागप्रमुख डॉ. डी. डी. कोमेजवार, प्रा. गौरी सूर्यवंशी यांनी केले.