शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची
4
मुलाचा मृत्यू झाल्यावर वडिलांनी मृतदेहासोबत पुरली बाईक; मन हेलावून टाकणारी घटना
5
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
6
ऐरोली स्थानकाजवळ चायनीजच्या गाडीत सिलिंडरचा स्फोट, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर!
7
...तर प्रवाशांनी खच्चून भरलेली ट्रेन दगड, मातीत गाडली जाईल
8
५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
9
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
10
Astrology: प्रेम होणे, प्रेमभंग होणे आणि प्रेमविवाह यशस्वी होणे याचेही पत्रिकेत विशिष्ट योग असतात!
11
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
12
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
13
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
14
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
15
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
16
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
17
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
18
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
19
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
20
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."

बंदी जुगारुन आमचे कार्य करत राहू, राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 14:15 IST

कुणाचीतरी सुपारी घेवून  काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस आणि राज्य सरकार करीत आहे

संदीप बावचेजयसिंगपूर : कुणाचीतरी सुपारी घेवून  काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस आणि राज्य सरकार करीत आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रत्नागिरीत यायला बंदी का घातली, हे विचारणार आहे. लोकशाहीचा गळा घोटून तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही संविधानाला अधिन राहून काम करणारे असून या बंद्या जुगारुन आम्ही आमचे काम करत राहू असा इशारा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जिल्हा बंदी घालावी असे काही कृत्य मी केले नाही. रत्नागिरीतील बारसू प्रकल्पग्रस्तांनी मला मदतीची हात दिली. त्यांची बाजू योग्य आहे. २०१३ च्या भूमि अधिग्रहण कायद्यानुसार कोणाही शेतकऱ्याच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहण करता येणार नाही. त्यामुळेच कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन मला माझी जमीन द्यायची नाही, ही भूमिका घेणाऱ्या बारसूच्या शेतकऱ्यांची बाजू मी घेतली.

वेळप्रसंग पडला तर आंदोलनाची तयारी ठेवा असे सांगून वेळोवेळी त्यांची बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडत राहिलो. त्यांच्या मदतीसाठी काही सहकाऱ्यांना त्याठिकाणी पाठविले. त्याचं भांडवल करुन रत्नागिरी पोलिसांनी मला ३१ मे पर्यंत जिल्हाबंदी घातली आहे. शिवाय सोशल मीडियावर बारसू प्रकल्पाविषयी काही लिहायचं नाही, बोलायचं नाही, चित्रफित टाकायचं नाही, असेही पोलिसांनी सांगितले आहे. 

याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणारसंविधानाने मला मुलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यावर निर्बंध आणले आहेत. म्हणून मी गप्प बसणार नाही. लोकसभा, विधानसभा सभागृहात मी संविधानाच्या कोणत्याही चौकटीचा भंग केलेला नाही. त्यामुळे अशाप्रकारचे निर्बंध माझ्यावर लादणे हा अन्याय आहे. कुणाचीतरी सुपारी घेवून  काम केल्यासारखे रत्नागिरी पोलीस एकूण राज्य सरकार करीत आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रत्नागिरीत यायला बंदी का घातली, हे विचारणार आहे.

मी काय आतंकवादी, नक्षलवादी आहे काय?

शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून देशभर फिरतो. काश्मिरमध्येही जातो पण त्या सरकारने मला बंदी घातली नाही. त्यामुळे रत्नागिरीमध्ये असं काय घडलय, मी काय आतंकवादी, नक्षलवादी आहे काय? लोकशाहीचा गळा घोटून तुम्ही जर काम करत असाल तर आम्ही संविधानाला अधिन राहून काम करणारे असून या बंद्या जुगारुन आम्ही आमचे काम करत राहू असा इशारा शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरीBarsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्पRaju Shettyराजू शेट्टीPoliceपोलिस