शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

Kolhapur Politics: कार्यकर्ते गेले दूर, रेडिमेड नेत्यांचीही आता सोडचिठ्ठी; राजू शेट्टींनी काय मिळवले..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:34 IST

कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..

शरद यादवकोल्हापूर : हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी अखेर स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीत प्रवेश देऊन तिकीट देणारे राजू शेट्टी यांना जवळच्या कार्यकर्त्यांचा रोष पत्कारावा लागला होता. या निर्णयाला विरोध करत वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीतून बाहेर पडत तोफ डागली होती. ज्या मिणचेकरांसाठी संघटनेत भगदाड पडले ते हातात धनुष्यबाण घेणार असतील तर शेट्टी यांनी यातून मिळवले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकारणाच्या बेरीज - वजाबाकीत चळवळीच्या गळ्याला नख लावले जात असल्याने शेतकऱ्यांचा आवाज क्षीण होत असल्याचे कटु वास्तव समोर येत आहे.

शरद जोशी यांनी लावलेल्या शेतकरी संघटनेच्या रोपट्याला यशाची फळे आणण्यासाठी ज्यांनी काम केले त्यात राजू शेट्टी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. २००३ नंतर पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी संघटनेने झंझावता तयार केला होता. ऊस दराचे अर्थकारण सोप्या भाषेत मांडत साखर कारखानदारांचे वाभाडे काढण्याचे काम स्वाभिमानीने केले. यामुळेच उसाला चांगला दाम मिळाला, दुधाचे दरही वधारले, शेतकऱ्यांच्या जीवनात चार सुखाचे दिवस आले. यामुळेच शेतकऱ्यांनीही आपला आवाज म्हणून राजू शेट्टी यांना जिल्हा परिषद, विधानसभा व्हाया लोकसभेत पाठवून कामाची पोचपावती दिली. २००९ व २०१४ मध्ये शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडले; पण शेतकऱ्यांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविल्याने विरोधकांचा प्रयत्न तोकडा पडला. जो पैलवान मातीत हारत नाही त्याला हातात हात देऊन पाडायचे असते, असे सांगितले जाते. २०१९ मध्ये शेट्टींना महाविकास आघाडीत प्रवेश केल्याने मातीत न हारणारा शेतकरी योद्धा हातात हात देऊन पराभूत झाला. येथूनच स्वाभिमानीचे बुरे दिन सुरू झाले. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वबळ आजमावत शेट्टींनी पुन्हा शेतकऱ्यांना साद घातली; परंतु ‘बुंद से गये ओ हौदासे नही आता’ या न्यायाने लोकांनी त्यांना नाकारले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघात गेली १५ वर्षे राबणारे वैभव कांबळे यांना ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवून शिवसेनेतून आलेले मिणचेकर यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज हाेऊन वैभव कांबळे बाहेर पडले. विधानसभेला मिणचेकरांचा पराभव झाला व कांबळे यांनीही संघटना सोडली. या सर्व राजकारणातून शेट्टी यांनी मिळवले काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळत नाही.

तिकिटासाठी हे आले अन् गेलेभारत भालके, संजय घाटगे, दत्ता घाटगे, मनोज घोरपडे, अमर यशवंत पाटील, विशाल पाटील, प्रमोद कदम व आता सुजित मिणचेकर यांनी निवडणुकीपुरता संघटनेचा बिल्ला छातीवर लावला व नंतर तो कधी काढला हे शेट्टींनाही कळले नाही.

कार्यकर्त्यांनी काय दगडेच मारायची का..करपलेल्या चेहऱ्याच्या कार्यकर्त्यांना संधी देणार, असे उठता बसता सांगणारे शेट्टी प्रत्यक्षात तसे वागतात का, याचे चिंतन करावे. कारण एक कार्यकर्ता तयार व्हायला दहा वर्षे लागतात. या विधानसभा निवडणुकीत जालंधर पाटील, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, जनार्दन पाटील यांनी स्वाभिमानीशी फारकत घेतली. ज्यांना निवडणुकीसाठी आयात केले तेही सोडून जात असतील कष्टकऱ्यांची ही चळवळ वाढवणार कोण याचे उत्तर शेट्टी यांनीच द्यावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना