शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Kolhapur Politics: ..तर हातकणंगलेत उमेदवार द्यावा लागेल, जयंत पाटील यांचा राजू शेट्टींना इशारा

By राजाराम लोंढे | Updated: March 26, 2024 14:07 IST

माढ्यात दुसरा उमेदवार तयार

कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी हे धर्मनिरपेक्ष आघाडीसोबत यावेत, असा आमचा प्रयत्न होता. मात्र, त्यांचा वेगळा पवित्रा दिसत आहे. त्यांनी आमचा पाठींबा घेतला नाहीतर ‘हातकणंगले’त उमेदवार द्यावा लागेल, तशी चाचपणी शिवसेनेकडून सुरु असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले.जयंत पाटील म्हणाले, ‘हातकणंगले’त राजू शेट्टी आमच्या वतीने लढावेत, अशी महाविकास आघाडीची इच्छा होती. शिवसेना नेत्यांशी त्यांची चर्चा सुरु असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, यात सकारात्मक चर्चा दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने तिथे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केल्याने काहीसा पेच निर्माण झाला असून यामध्ये आणखी काही मार्ग निघतो का? यासाठी प्रयत्न सुरु आहे. ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत बोलणे सुरू आहे,  दोन दिवसात अपेक्षित निर्णय होईल. असेही त्यांनी सांगितले. ‘सातारा’तून खासदार उदयनराजे भोसले आमच्या संपर्कात नसल्याचेही त्यांनी सांगितले.

माढ्यात दुसरा उमेदवार तयारमाढ्याची जागा ‘रासप’चे नेते महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. त्यांनी सहमती दर्शवली पण, ऐन वेळी ते महायुतीसोबत गेले. येथे दुसरा उमेदवार तयार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

कोल्हापूर’, ‘सातारा’तच पराभव मग ४५ प्लस कसे?भाजपच्या ४५ प्लस घोषणाची खिल्ली उडवताना जयंत पाटील म्हणाले, महायुतीचा ‘कोल्हापूर’ व ‘सातारा’ येथे पराभव निश्चित आहे. यापेक्षा वेगळे वातावरण महाराष्ट्रात नाही.

धनगर समाज भाजपवर नाराजभाजपने धनगर समाजाची सातत्याने फसवणूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हा समाज त्यांच्यावर नाराज असून लोकसभा निवडणूकीत ते दिसेल, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाhatkanangle-acहातकणंगलेRaju Shettyराजू शेट्टीJayant Patilजयंत पाटील