शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ?, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने फोनवरून चर्चा केल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 14:10 IST

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ...

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबाबत नाराजी असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना महायुतीत येण्याची गळ घातली असल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने शेट्टी यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.विशेष म्हणजे महाविकास आघाडीतूनही शेट्टी यांना लढण्यासाठी आग्रह धरला जात आहे. शेट्टी यांनी मात्र इचलकरंजीतील मेळाव्यात ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून ऑफर असताना शेट्टी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.या मतदारसंघातील विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत. मात्र, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत त्यांच्याबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याचा अहवाल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेची एक हक्काची जागा कमी होण्यापेक्षा एनडीए आघाडीतील पूर्वाश्रमीचे मित्र असलेल्या राजू शेट्टी यांनाच जवळ करत ही जागा सेफ करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. त्या अनुषंगानेच शेट्टी यांच्याशी जुळवून घेण्यासाठी पावले टाकली जात असल्याचे कळते.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी शेट्टी हे गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर एनडीए आघाडीत आले होते. मात्र, पुढे मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत ते यातून बाहेर पडले. काँग्रेस-राष्ट्रवादी साथ घेत त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली; पण त्यात त्यांना अपयश आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा