शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

राजेश क्षीरसागर यांचा जयश्री जाधव यांनी केलेल्या कामांवर डल्ला; भारती पोवार यांचा आरोप

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: October 2, 2023 16:02 IST

जाधव यांच्या कामांचे श्रेय लाटून कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धुळफेक

कोल्हापूर : आमदार जयश्री जाधव यांच्या मागणीनंतर रंकाळा संवर्धनासाठी ३.५८ कोटींचा निधी मंजूर झाला, दिगंबर फराकटे यांच्यावरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाला, हद्दवाढीसाठी त्यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे, पण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे जाधव यांच्या कामांचे श्रेय लाटून कोल्हापुरकरांच्या डोळ्यात धुळ फेकत आहेत. एवढेच असेल तर त्यांनी नवी कामे करून निवडणुकीसाठी जनतेसमोर जावे, अन्य लोकप्रतिनिधींच्या कामांवर डल्ला मारणे खपवून घेतला जाणार नाही. नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पोवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.त्या म्हणाल्या, आमदार जयश्री जाधव या प्रसिद्धी न करता विकासाचे व मदतीचे काम करत आहेत. रंकाळा संवर्धन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा हद्दवाढीसाठीचे प्रयत्न याबाबतची कागदपत्रे व पुरावे त्यांच्याकडे असताना क्षीरसागर हे महिला आमदाराला त्रास देत आहेत. खोटे बोलून त्यांच्या कामांचे श्रेय लाटत आहेत. अधिवेशन काळात जाधव यांनी कोल्हापूरच्या हद्दावाढीकडे शासनाचे लक्ष वेधले, त्यावर प्रशासकीय हालचाली सुरू असताना क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सांगण्यावरून बैठक घेतल्याची खोटी बातमी दिली. मुख्यमंत्री कार्यालयातून १ सप्टेंबरपासूनच्या कामकाजाची माहिती घेतली असता अशी बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले.रंकाळा संवर्धनाबाबत क्षीरसागर यांचे पेड पदाधिकारी व टेंडरवाले सुजित चव्हाण हे जाधव यांच्यावर आरोप करत आहेत. प्रशासकीय कामाचे, लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे ज्ञान नसलेल्यांनी त्यांच्याबद्दल बोलू नये, रंकाळा संवर्धनासाठी जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या पत्रानंतर समितीने आयुक्तांना २८ ऑगस्टला मंजुरीचे पत्र दिले. त्या पत्राच्या संदर्भसुचीत जाधव यांच्या पत्राचा स्पष्ट उल्लेख आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरcongressकाँग्रेस