Rajesh Kshirsagar, Executive Chairman, State Planning Commission | राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर
राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : राज्य नियोजन आयोगाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतल्याने या पदाची माळ क्षीरसागर यांच्या गळ्यात पडली. रविवारी नियुक्तीबद्दल ठाकरे यांनी क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
गेल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर आलेल्या पक्षप्रमुख ठाकरे यांनी कोल्हापूरला योग्य संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार क्षीरसागर यांच्या नावाची मंत्रिमंडळ विस्तारात चर्चा सुरू होती. त्यांना राज्यमंत्रिपद मिळण्यासाठी उद्धव ठाकरे आग्रही होते; परंतु मंत्रिमंडळातील संख्याबळ वाढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले.


Web Title: Rajesh Kshirsagar, Executive Chairman, State Planning Commission
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.