शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जावयाचा त्रास आवरा; फलकावरून गायब झाला सासरा, कोल्हापुरात रंगले राजकीय युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 12:14 IST

क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना आ.पाटील यांना मुद्दामहून वगळल्याची चर्चा

कोल्हापूर : मतदारसंघात जावई वारंवार त्रास देत असून त्याला आवर घालण्याची मागणी सासऱ्यांकडे करूनही त्यात फरक न पडल्याने त्याचा थेट परिणाम आमदार असणाऱ्या सासऱ्याला भोगावा लागल्याचा प्रत्यय कोल्हापुरातील शिवसेनेच्या (शिंदे गट) महाअधिवेशनात पाहायाला मिळाला.त्याचे झाले असे : शिवसेनेचे सांगोला (जि. सोलापूर) मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे जावई रविकिरण इंगवले हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचे विरोधक आहेत. शिवसेनेच्या महाअधिवेशनाची पूर्ण जबाबदारी क्षीरसागर यांच्याकडे आहे. त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा फ्लेक्स उभा करत त्यावर शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार यांचे फोटो लावले आहेत. मात्र, यात शहाजीबापू पाटील यांचा फोटो नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. 'काय झाडी काय डोंगर' या डायलॉगमुळे शहाजीबापू राज्यभर प्रसिद्ध आहेत. मात्र, क्षीरसागर यांनी स्वागतपर फ्लेक्स उभा करताना आ.पाटील यांना मुद्दामहून वगळल्याची चर्चा आहे. रविकिरण इंगवले हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत. शिवाय शहराचे माजी उपमहापौरही राहिले आहेत. शिवसेना एकत्र असताना इंगवले व क्षीरसागर यांच्यामध्ये कमालीचा दोस्ताना होता. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर दोघांनीही वेगवेगळे राजकीय पर्याय निवडल्याने त्यांच्यात बिनसले.गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये या ना त्या कारणाने वाद, आरोप-प्रत्यारोप होत आहेत. इंगवले यांच्याकडून होणारा त्रास क्षीरसागर यांनी आ. पाटील यांच्या कानावर घातला आहे. मात्र, सासऱ्याने सांगूनही हा त्रास थांबत नसल्याने क्षीरसागार यांनी आ. पाटील यांना फ्लेक्सवरुन वगळत जावयावरचा राग थेट सासऱ्यावर काढला की काय, अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv Senaशिवसेना