शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:58 IST

शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.

Kolhapur Lok Sabha ( Marathi News ) :कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक हे मैदानात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना तिकीट देण्यात आलं आहे. थेट शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अशातच आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात सभा होणार आहे. या सभेपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांवर निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.

"सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असल्याने त्यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. काँग्रेस नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळे त्यांनी लोकसभा उमेदवारीची माळ शाहू महाराजांच्या गळ्यात घातली आणि शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला आहे. त्यांनी राजकारणापासून दूर राहावं, अशी आमची इच्छा होती. कारण छत्रपती हेच सर्वांत मोठं पद आहे. मात्र आता ते एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले," अशा शब्दांत राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, जिथं-जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते तिथं तिथं एनडीएच्या उमेदवाराचा विजय होतो, त्यामुळे सतेज पाटील यांचा जळफळाट झाला आहे, असा टोलाही क्षीरसागर यांनी लगावला आहे.

सतेज पाटील काय म्हणाले होते?

सतेज पाटील यांनी एका प्रचारसभेत बोलताना संजय मंडलिकांवर जोरदार टीका केली. "करवीरच्या गादीची पुण्याई मोठी आहे, कोल्हापूर जिल्ह्यावर गादीचे अनंत उपकार आहेत.त्यामुळे गादीचा सन्मान राखा, गादीवर बोलू नका. हवे तर माझ्यावर बोला, मी उत्तर द्यायला समर्थ आहे, असं आम्ही खासदार संजय मंडलिक यांना सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी गादीचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, मी राजकारणात कसलेला पैलवान आहे. शडडू ठोकलाय, माती अंगावर घेतली आहे, चितपट केल्याशिवाय राहणार नाही," असं आव्हान पाटील यांनी दिलं होतं.

कोल्हापूरच्या मैदानात घुमणार मोदींचा आवाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा शनिवारी (दि. २७) तपोवन मैदानावर होणार असून, त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सुरक्षेच्या कारणामुळे सभेच्या ठिकाणी खासगी ड्रोन कॅमेरे उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. विविध सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. राज्य गुप्त वार्ता विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. मोदी यांच्यासोबत राज्यातील महायुतीचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळापासून ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांसह, राज्य राखीव पोलिस, जिल्हा पोलिस, होमगार्ड तैनात केले जाणार आहेत.  

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४