शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP Election 2026: शिरोळमध्ये यड्रावकरांच्या पॉवर गेमने महाविकासची समीकरणे बिघडवली, भाजपसमोर नवी आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:08 IST

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला आता शून्यातून बांधणी करावी लागणार

संदीप बावचेशिरोळ : शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनी ग्रामीण भागातील राजकीय वर्चस्वाची नवी समीकरणे स्पष्ट केली आहेत. या निकालाने महाविकास आघाडीसाठी आत्मचिंतनाची गरज अधोरेखित केली असतानाच, भाजपला आपल्या मर्यादा आणि संधींची जाणीव करून दिली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची रणनीती तालुक्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.ग्रामीण बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला अपेक्षित पकड निर्माण करता आलेली नाही. जि.प., पं.स. निवडणुकीच्या निमित्ताने स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, उध्दवसेना यांनी एकत्र मोट बांधली. माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी जागा वाटपाचे धोरण राबवून यश मिळविण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पेरणी या निवडणुकीत दिसून आली नाही. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीला आता शून्यातून बांधणी करावी लागणार आहे.भाजपने या निवडणुकीत ग्रामीण भागातील आपल्या ताकदीचा अंदाज घेतला आहे. जरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरीही नव्याने राजकीय बांधणी करण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. विखुरलेल्या मतप्रवाहांना एकत्र आणण्याचे काम भाजपने केले आहे. येणाऱ्या काळात भाजपचे सावकर मादनाईक, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे पक्षाची कशी बांधणी करतात यावरच सर्वकाही अवलंबून आहे.आमदार यड्रावकर यांनी आखलेली व्यूहरचना यशस्वी झाल्याचे चित्र आहे. महायुतीच्या झेंड्याखाली काम करताना त्यांनी आपल्या समर्थकांना बळ दिले आणि ग्रामीण भागातील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. यड्रावकर यांना मिळालेल्या यशामुळे आता भाजपची भूमिका कळीची ठरणार आहे. येणाऱ्या काळात ३५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधीउदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले अमोल चव्हाण यांनी यापूर्वी मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषविले होते. यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेल्या अर्चना चौगुले यापूर्वी पंचायत समिती सदस्या होत्या. पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले चौदा उमेदवार हे नवे चेहरे ठरले आहेत.

कोणाला किती मतेशिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडी व शाहू आघाडीने सात जागा तर भाजपने चार जागा लढविल्या होत्या. जि.प. मतदारसंघातून शाहू आघाडीला ७३१५४, महाविकास आघाडीला ५८५१२ तर भाजपला ३०३७३ अशी मते मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP Election: Yadravkar's Power Play Disrupts Alliances, Challenges BJP.

Web Summary : Yadravkar's strategy reshaped Kolhapur's political landscape. The results exposed weaknesses in the Maha Vikas Aghadi alliance and highlighted opportunities for the BJP in upcoming elections. Alliances need strengthening before future polls.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारण