शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा, आता कोणत्या तोंडाने मते मागता..?, खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:40 IST

कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

कोल्हापूर : पाच वर्षे तुम्ही पालकमंत्री, राज्याच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री होता, तेव्हा कोल्हापूर शहर, जिल्ह्याच्या विकासाठी काय केले? सत्तेत असताना तुम्ही येथील राजर्षी शाहू जन्मस्थळाला दमडीचीही मदत केली नाही. ते आता कोणत्या तोंडाने मते मागत आहेत, अशी विचारणा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी येथे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना केली.

शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक परिसरात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिवाजी पेठेत जे ठरते, ते राज्यात आणि देशात पसरते. यामुळे शिवाजी पेठेेने भरघोस मते देऊन जयश्री जाधव यांना आमदार करावे. कोल्हापूरला छत्रपती ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे. त्याच भूमीत विरोधकांकडून एका प्लंबरचे, इलेक्ट्रिशियनचे काम त्यांच्या पत्नीला जमते का ? ज्यांचे काम त्यांनीच करावे, असे सांगत महिलांचा अवमान केला आहे. त्यांना शिवाजी पेठेतील महिलांनी धडा शिकवावा.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, सत्तेचा माज आणि लालसेपोटी भाजपने उत्तरची पोटनिवडणूक लादली. त्यांच्या विजयाचा वारू कोल्हापूरची स्वाभिमानी जनता निश्चितपणे रोखणार आहे. जाती, जातीमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी भाजून घेणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हे काम शिवाजी पेठेतील मतदार निश्चितपणे करतील.क्षीरसागर म्हणाले, पालकमंत्री असताना गणेशोत्सव बंद पाडण्याचे काम केलेले आता मते मागत फिरत आहेत. त्यांना कोल्हापूरची जनता हिमालयात पाठवतील.

यावेळी उमेदवार जयश्री जाधव यांनी दिवंगत चंद्रकांत जाधव यांची अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी संधी देण्याचे आवाहन केले. माजी आमदार सुरेश साळोखे, भारती पोवार यांची भाषणे झाली. सभेस शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी महापौर सई खराडे, आर. के. पोवार, रविकिरण इंगवले, विजय देवणे, संजय पवार, सरला पाटील, शिवाजी जाधव, उत्तम कोराणे, सचिन चव्हाण, विक्रम जरग, अजय इंगवले, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, खासदार डॉ. कोल्हे यांची कदमवाडीतही सभा झाली.

शिवाजी पेठेचं ठरलंय..यावेळी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी शिवाजी पेठेचं ठरलयं, जयश्री जाधव यांना आमदार करायचं, असे सांगितले.

ज्योतिषीची पुणेवारी

कोल्हापुरातील एक ज्योतिषी पुणेवारी करीत आहे. सरकार आज पडणार, उद्या पडणार, ईडी याची चौकशी करणार, त्यांना अटक करणार असे वारंवार सांगत आहेत, अशी टीका खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेchandrakant patilचंद्रकांत पाटील