राजारामची मार्चअखेरची बिले जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:30+5:302021-05-12T04:24:30+5:30
कारखान्याच्या वतीने माहे फेब्रुवारी-२०२१ अखेरची बिले यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांना अदा केलेली आहेत. त्यानंतर दि.१ मार्च ते १७ मार्च ...

राजारामची मार्चअखेरची बिले जमा
कारखान्याच्या वतीने माहे फेब्रुवारी-२०२१ अखेरची बिले यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांना अदा केलेली आहेत. त्यानंतर दि.१ मार्च ते १७ मार्च या अखेरच्या कालावधीतील गळितासाठी आलेल्या ३४ हजार ४९२ मेट्रिक टन उसाची २,७९७/- रुपये प्रतिमेट्रिक टनप्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ मे रोजी जमा केलेली आहे.
ऊसपुरवठादारांनी आपापल्या बँकेशी संपर्क साधून ऊस बिलाचे पेमेंट घेऊन जावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांनी केले आहे, तसेच या गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या सर्व सभासदांचे त्यांनी आभार मानले असून, पुढील गळीत हंगामासाठी उसाची नोंद देण्याबाबत आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव माने व व्हा. चेअरमन वसंत बेनाडे यांच्यासह संचालक उपस्थित होते.