राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:24 AM2021-07-30T04:24:18+5:302021-07-30T04:24:18+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी ...

The Rajarampuri market is buzzing again | राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली

राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार दि. १९ जुलैपासून दुकाने सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला. मात्र, तीननंतर जोरदार पाऊस आणि महापुरामुळे पुन्हा चार दिवस दुकाने बंद झाली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून दुकाने पूर्ववत सुरू झाली. राजारामपुरी व्यापारपेठेत रेडिमेड गारमेंट, ज्वेलर्स, गिफ्ट आर्टीकल, फूड प्रॉडक्ट, मेडिकल, आदी १,७०० दुकाने आहेत. त्यातील ८० दुकानांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोरोनानंतर महापुरातून सावरून दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे.

प्रतिक्रिया

व्यापार, व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत आहे. पण, राजारामपुरीतील बहुतांश दुकाने १० वाजता उघडण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कोरोना आणि महापुराचा बसलेला फटका लक्षात घेऊन शासनाने सर्व दुकाने रात्रीनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. विकेंड लॉकडाऊनही रद्द करावा.

-ललित गांधी, अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

गेल्या तीन दिवसांपासून राजारामपुरीतील आमचे दुकाने पूर्ववत सुरू झाले आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यवहारांची गतीही वाढत आहे. दुकाने सुरू ठेवण्याची सध्याची वेळ गैरसोयीची ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आम्हा सर्व व्यापाऱ्यांना वाढवून मिळावी.

- प्रशांत पोकळे, मालक, बालाजी कलेक्शन

पॉइंटर

राजारामपुरी व्यापारपेठ दृष्टिक्षेपात

दुकानांची संख्या : १,७००

वार्षिक उलाढाल : ७०० कोटी

फोटो (२९०७२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारपेठ, ०१, ०२) : कोरोनानंतर महापुराच्या स्थितीतून सावरत कोल्हापुरातील व्यापार, व्यवसाय सुरू झाला आहे. राजारामपुरी व्यापारपेठेतील बालाजी कलेक्शनमध्ये गुरुवारी ग्राहकांकडून कपडे खरेदी करण्यात आली.

फोटो (२९०७२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारपेठ ०३) : कोरोनानंतर महापुराच्या स्थितीतून सावरत कोल्हापुरातील व्यापार, व्यवसाय सुरू झाला आहे. राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

290721\29kol_2_29072021_5.jpg~290721\29kol_3_29072021_5.jpg~290721\29kol_4_29072021_5.jpg

फोटो (२९०७२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारपेठ, ०१, ०२) : कोरोनानंतर महापुराच्या स्थितीतून सावरत कोल्हापुरातील व्यापार, व्यवसाय सुरू झाला आहे. राजारामपुरी व्यापारपेठेतील बालाजी कलेक्शनमध्ये गुरूवारी ग्राहकांकडून कपडे खरेदी करण्यात आली.~फोटो (२९०७२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारपेठ, ०१, ०२) : कोरोनानंतर महापुराच्या स्थितीतून सावरत कोल्हापुरातील व्यापार, व्यवसाय सुरू झाला आहे. राजारामपुरी व्यापारपेठेतील बालाजी कलेक्शनमध्ये गुरूवारी ग्राहकांकडून कपडे खरेदी करण्यात आली.~फोटो (२९०७२०२१-कोल-राजारामपुरी व्यापारपेठ, ०१, ०२) : कोरोनानंतर महापुराच्या स्थितीतून सावरत कोल्हापुरातील व्यापार, व्यवसाय सुरू झाला आहे. राजारामपुरी व्यापारपेठेतील बालाजी कलेक्शनमध्ये गुरूवारी ग्राहकांकडून कपडे खरेदी करण्यात आली.

Web Title: The Rajarampuri market is buzzing again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.