शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राजाराम कारखाना निवडणूक: आमचं ठरलंय, आता कंडका पाडायचा, शक्तिप्रदर्शनाने सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:50 IST

कोल्हापूरच्या बारा हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना होईल

कसबा बावडा : आमचं ठरलंय ‘आता कंडका पाडायचाच’ अशा घोषणा देत सोमवारी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील गटाच्या राजर्षी शाहू परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सासणे ग्राउंड येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीद्वारे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, गेली २८ वर्षं हा कारखाना महाडिक यांच्या ताब्यात आहे. पण इतर कारखान्यांच्या तुलनेत दोनशे रुपये प्रतिटन दर कमी देण्याचे पाप येथे केले जातेय. बेडकिहाळला सहवीज प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, डिस्टलरी प्रकल्प झालेत. मग राजाराममध्ये असे प्रकल्प का झाले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. आम्ही सातत्याने यासाठीच लढा देतोय.

कोणताही प्रकल्प न करता सभासदांवर फक्त अन्याय केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या विषयाचा एकदा कंडका पडला पाहिजे अशी सभासदांची भूमिका आहे. पाटील म्हणाले, मागच्या वेळी बाहेरगावचे सभासद होते. तरी आमचे पॅनल अवघ्या शंभर मतांनी मागे राहिले. आता तर लोकांमधूनच उद्रेक आहे. गेली २८ वर्षे कारखाना त्यांच्या ताब्यात आहे. आता पाच वर्षे आमच्याकडे द्यावा. कोल्हापूरच्या बारा हजार सभासदांच्या मालकीचा हा कारखाना होईल. तो बाहेरच्या सहाशे लोकांच्या ताब्यात देऊ नये. मयत सभासदांचे शेअर्स त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे वर्ग केले जातील, अशी ग्वाहीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, विजयमाला विश्वास नेजदार, शशिकांत खवरे, महेश चव्हाण, बाजीराव पाटील, अजित पाटील, अभिजित भंडारी, राजकुमार पाटील, उत्तम सावंत, दिलीप पाटील (टोप), बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती हिंदूराव ठोंबरे, बाबासो माळी, विजय पाटील, बी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील