शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
4
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
5
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
6
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
7
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
8
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
9
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
10
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
11
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
12
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
13
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
14
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
15
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
16
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
17
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
18
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
19
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
20
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...

राजन गवस यांच्या नावे नोकरी लावण्याचे होताहेत कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 10:39 IST

Fraud Crimenews Kolhapur : मराठीतील कसदार लेखक डॉ. राजन गवस यांचा मुलगा व मुलगीच्या नावे व्हॉटस‌्अ‍ॅपवरून मेसेज पाठवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबद्दल गवस यांनी भुदरगड पोलिसांत संबंधित तरुणांवर कारवाई करण्यासाठी २४ जूनला लेखी तक्रार केली आहे; परंतु पोलिसांकडून आजअखेर कोणतीच कारवाई झालेली नाही.

ठळक मुद्देव्हॉटसअपवरही होतेय चॅटींग भुदरगड पोलिसांत तक्रार देवूनही कारवाई नाही

विश्र्वास पाटीलकोल्हापूर : मराठीतील कसदार लेखक डॉ. राजन गवस यांचा मुलगा व मुलगीच्या नावे व्हॉटस‌्अ‍ॅपवरून मेसेज पाठवून फसवणूक केली जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याबद्दल गवस यांनी भुदरगड पोलिसांत संबंधित तरुणांवर कारवाई करण्यासाठी २४ जूनला लेखी तक्रार केली आहे; परंतु पोलिसांकडून आजअखेर कोणतीच कारवाई झालेली नाही. अशा प्रकारे नोकरीचे आमिष व अन्य कारणे देऊन किमान १५ मुलींना फसविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.डॉ. गवस यांचे नाव मराठी साहित्यविश्वाला चांगले परिचित आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या अथवा मुलीच्या नावे मेसेज गेल्यावर लोकांतही संभ्रम निर्माण होत आहे. आपल्या नावांचा वापर करून कोणीतरी गोरगरीब मुलामुलींची फसवणूक करू नये, असे डॉ. गवस यांना वाटते. मोबाईल क्रमांक : ९३२२६१७५९९ या नंबरवरून कॉल व चॅटिंग केले जात आहे.

ट्रू कॉलरवर हा नंबर संहिता राजन या नावाने नोंद असल्याचे दिसते. संहिता हे डॉ. गवस यांच्या मुलीचे नाव आहे. प्रत्यक्षात हा नंबर तिचा नाही. तो संग्राम यशवंत देसाई (रा. आंतुर्ली, ता. भुदरगड) यांचा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. हे फोन देसाई करतात की अन्य कोण करते, याची चौकशी पोलिसांनी करण्याची गरज आहे. मुलाचे नाव सांगून मुलींना फोन केले जात आहेत. त्यांना लग्नाचे आमिष दाखविले जात आहे. एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखविण्यात आले.

काही तरुणींना त्याने कोरे धनादेश दिले आहेत. नोकरीची बोलणी करण्यासाठी पुण्यात या, असा फोन वर्धा येथील व्यक्तीस करण्यात आल्याची तक्रार डॉ. गवस यांच्यापर्यंत आली आहे. याच नंबरवरून दूरचित्रवाणीवरील काही अभिनेत्यांशीही संपर्क साधण्यात आला आहे. या फोनचा डॉ. गवस कुटुंबीयांना नाहक मानसिक त्रास होत आहे. 

डॉ. गवस यांची तक्रार आमच्याकडे आली आहे; परंतु व्हॉटस‌्ॲपवरील चॅटिंग उपलब्ध होत नसल्याने कारवाईत अडचणी आहेत. तरीही संबंधित तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना गडहिंग्लज पोलीस उपअधीक्षकांनी दिल्या आहेत; परंतु मी सुट्टीला गावी आलो असल्याने अजून कारवाई केलेली नाही.- सतीश मयेकरसाहाय्यक पोलीस निरीक्षक, भुदरगड पोलीस ठाणे

टॅग्स :fraudधोकेबाजीWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस