महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST2020-12-14T04:36:22+5:302020-12-14T04:36:22+5:30

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ८५ वा रविवार ...

Raise three tons of garbage in Mahasvachchata Abhiyan | महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव

महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ८५ वा रविवार होता. सामाजिक संघटना, ‘एनएसएस’चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली.

वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेने चार पथके विभागून शहरातील पंचगंगा परिसर, फुलेवाडी चौथा स्टॉप, हरिओमनगर, रंकाळा चौक, निर्माण चौक ते संभाजीनगर, बागल चौक, जनता बझार चौक, शिवाजी उद्यमनगर, दौलतनगर, महापालिका शाळा, सायबर चौक येथे असणाऱ्या ५५० झाडांना पाणी घालून, अनावश्यक तण काढून, औषध फवारणी करीत प्लास्टिकचा कचरा गोळा केला. स्वरा फौंडेशनच्या वतीने शालिनी पॅलेस ते जाऊळाचा गणपती परिसर, रंकाळा मेन रोड या परिसरात रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकांच्या बाजूची माती काढून स्वच्छता केली.

यावेळी स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे, ‘आप’चे संदीप देसाई, स्वरा फौंडेशनचे विकी महाडिक, पीयूष हुलस्वार, प्राजक्ता माजगावकर, अमृता वास्कर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, साजिद शेख, लव बकरे, ओंकार कांबळे, रोहन बेविनकट्टी, डॉ. तृप्ती जाधव, उदयसिंह जाधव, तात्या गोवावाले, आदी उपस्थित होते.

चौकट

स्वच्छ केेलेला परिसर

आयटीआय मेन रोड ते शासकीय मध्यवर्ती कारागृह मेन रोड, खानविलकर पेट्रोल पंप ते सीपीआर चौक, रंकाळा चौक ते फुलेवाडी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड मेन रोड, सीपीआर चौक ते शुगर मिल चौक, डीएसपी चौक ते भगवा चौक.

महापालिकेची यंत्रणा

तीन जेसीबी, सहा डंपर, तीन आरसी गाड्या, एक ट्रॅक्टर, तीन औषध फवारणी टँकर, १५० महापालिका कर्मचारी.

फोटो : १३१२२०२० कोल केएमसी स्वच्छता१

फोटो : १३१२२०२० कोल केएमसी स्वच्छता२

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान राबविले. यावेळी महापालिका, सामाजिक संघटनांसह ‘एनएसएस’चे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

फोटो : १३१२२०२० कोल केएमसी स्वच्छता३

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता अभियानासोबत सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण केले.

बातमीदार : विनोद

Web Title: Raise three tons of garbage in Mahasvachchata Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.