धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 05:01 PM2019-09-13T17:01:43+5:302019-09-13T17:04:07+5:30

गेल्या चार दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. पाटगाव जलाशयात अतिवृष्टी झाली आहे.

 Rainfall increased in the dam area | धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Next
ठळक मुद्दे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलागगनबावड्यात सर्वाधिक पाऊस, शिरोळ निरंक

कोल्हापूर: गेल्या चार दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. पाटगाव जलाशयात अतिवृष्टी झाली आहे.

गगनबावड्यात सर्वाधिक ३७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. शिरोळमध्ये पावसाचा एक थेंबही नाही. आणखी दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पंचगंगेसह सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली असतानाच सोमवारपासून पावसाने उसंत घेतली. परिणामी पूराचे पाणीही झपाट्याने ओसरु लागले. पात्राबाहेर पडलेल्या नद्या पुन्हा एकदा पात्राच्या येत असतानाच गुरुवारी दुपारपासून पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

किरकोळ पडणाऱ्या सरींची तीव्रता शुक्रवारी जास्तच झाली आणि कांही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सरी येत राहिल्या. गगनबावड्यात ३७, शाहूवाडीत १४, राधानगरीत १५, चंदगड व करवीरमध्ये ५, कागल व गडहिग्लज २, भूदरगड १0, आजऱ्यात १६ असा एकूण ११८ मि.मि पाऊस शुक्रवारी सकाळी ८ पर्यंत नोंदवला गेला.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसात सातत्य आहे. पाटगाव जलाशात सर्वाधिक ९३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कासारी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात ७२ तर जंगमहट्टी ७ मिलिमीटर वगळता १५ ते ४७ मिलीमीटर असा पाऊस सर्वच जलाशयात नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर वाढत असलातरी अजून सांडव्यातून विसर्ग वाढलेला नाही. त्यामुळे नद्यांतील पाणी पातळीही वाढलेली नाही.
 

 

Web Title:  Rainfall increased in the dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.