शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप, नद्यांच्या पाणी पातळीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 12:51 IST

अद्याप ४२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून पडणाऱ्या हलक्या सरी वगळता दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. अजूनही ४२ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात तुरळक पाऊस असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदी सध्या २६.०९ फुटावर पोहोचली आहे.शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. यामुळे शहरात सकाळपासूनच ऊन होते. जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.३ मिलिमीटर इतकीच पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ३२.७ मिलिमीटर पावसाची नोंद गगनबावडा तालुक्यात झाली. पाऊस कमी असला तरी धरणातून विसर्ग कायम आहे. रात्रीत तीन फुटांनी वाढ झालेल्या पंचगंगेची पातळी दिवसभरात मात्र केवळ तीन इंचांनीच वाढली.राधानगरीतून प्रति सेकंद ३१००, वारणातून ४५०० तर दूधगंगातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी संथगतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात २६.०९ फुटापर्यंत पोहोचली. दरम्यान, गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १७ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले.

धरणसाठा, टीएमसीत कंसात पाऊस मिलिमीटर -

  • राधानगरी - ६.८४ (९७)
  • तुळशी - २.७५ (४४)
  • वारणा - २८.२७(२७)
  • दूधगंगा - १७.२६ (३६)
  • कासारी - २.०० (१९)
  • कडवी - २.२० (२३)
  • कुंभी - २.०५ (२५)
  • पाटगाव - ३.३२ (७०)

पंचगंगा नदी २६.०९ फुटांवर अजूनही ३८ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात तुरळक पाऊस असला तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या माहितीनुसार पंचगंगा नदी सध्या २६.०९ फुटांवर पोहोचली आहे.