शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप; नद्यांची पातळी ओसरली, २३ बंधारे झाले मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:56 IST

शुक्रवारपासून पाऊस जोर पकडणार?

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळी ओसरू लागली आहे. दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळी तीन फुटाने कमी झाल्याने २३ बंधारे मोकळे झाले आहेत. आणखी दोन दिवस, असेच वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मंगळवारी सकाळपासून आकाश मोकळे दिसत होते. दिवसभरात ऊन राहिले, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी व चंदगड तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळी ओसरू लागली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली. सकाळी पंचगंगा नदीची पातळी ३२.११ फूट होती, दिवसभरात पाऊस नसल्याने ती २९.११ फुटापर्यंत खाली आली होती. आता २८ बंधारे पाण्याखाली आहेत, आज बुधवारपर्यंत आणखी बंधारे मोकळे होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. जिल्ह्यात १३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.दरम्यान, आज व उद्या गुरुवारी उघडझाप राहणार असून शुक्रवार (दि. १२) पासून पाऊस जोर पकडेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

‘वारणा’ निम्मे भरले..वारणा व तुळशी धरण ५० टक्के भरले आहे. सध्या धरणक्षेत्रात पाऊस नसल्याने पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत नाही.

तालुका/पाऊस (मिमी)हातकणंगले व शिरोळ - निरंकपन्हाळा - ०.७शाहूवाडी - १.५राधानगरी - ४.८गगनबावडा- ६.२करवीर- १कागल- ०.९गडहिंग्लज- ०.३भुदरगड - ४.३आजरा - ०.८चंदगड - १०.२.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदी