शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सकाळी पावसाचा शिडकावा, दिवसभर उन्हाचा तडाखा; पेरण्या खोंळबल्या

By भीमगोंड देसाई | Updated: June 15, 2023 17:48 IST

मान्सूनचे आगमन झाले नसल्याने पेरण्या खोळंबल्या, धूळवाफ पेरणीवर दुबार पेरणीचे संकट

कोल्हापूर : सकाळी पावसाचा शिडकावा आणि दिवसभर उन, ढगाळ असे वातावरण आज, गुरूवारी दिवसभर राहिले. मान्सूनचे अजूनही आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत. धूळवाफ पेरणीवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. खडकाळ जमिनीवरील ऊस वाळत आहे.जूनचा पहिला आठवडा कोरडा गेला. मृग नक्षत्रावरील पेरणीचा मुहूर्त हुकला आहे. आकाशात ढगांची गर्दी होत आहे. मात्र पाऊस जोरदार बरसत नसल्याचे चित्र आहे. गुरूवारी सकाळी नऊपर्यंत शहर, परिसर आणि जिल्हयात पावसाचा शिडकावा राहिला. त्यावेळी जोरदार पावसाला सुरूवात होणार असे ढग दाटून आले होते. पण काही वेळताच ढगांची गर्दी कमी झाली. प्रखर उन पडले. दुपारी उन्हाचा तडाका राहिला.जून महिला निम्मा संपला तरी उन्हाळाच जाणवत आहे. यामुळे साऱ्यांनाच पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. रेनकोट, छत्री असे पावसाळी साहित्य विकणारे दुकानदार, खते, बियाणे विक्रेत्यांचे डोळेही पावसाकडेच लागून राहिले आहेत. जोरदार पाऊस नसल्याने सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. नदीतील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. कोल्हापूर शहरासह नदी काठावरील गावांतही पाणी टंचाई निर्माण होत आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे.

चोवीस तासातील पाऊस असागुरूवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस असा : हातकणंगले - ०, शिरोळ -०, पन्हाळा -०.१, शाहूवाडी २.५, राधानगरी -०.५, गगनबावडा-६.४, करवीर-०.१, कागल-०, गडहिंग्लज-१, भुदरगड-४.५, आजरा -८.९, चंदगड -३.६.

केवळ ४.२ टक्के पाऊसजिल्हयात १ ते १४ जून अखेर केवळ ४.२ टक्के पाऊस झाला आहे. जोरदार आणि दमदार पाऊसच नसल्याने पेरणी कामे थांबली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी