शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ऐन थंडीत कोल्हापुरात बरसल्या पावसाच्या सरी, साखर गाळप हंगामात अडचणी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 12:08 IST

कोल्हापूर : दिवसांगणिक वेगाने होणाऱ्या वातावरणीय बदलातून काल, गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दि. ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणासहीत ...

कोल्हापूर : दिवसांगणिक वेगाने होणाऱ्या वातावरणीय बदलातून काल, गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दि. ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या पावसाने साखर गाळप हंगामात अडचणी येणार आहेत.शहरात विविध ठिकाणी काल, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून तासभर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगला पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. अनेक परिसरात पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री सेल्सिअस ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यान आहे. पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ डिग्री सेल्सिअस ग्रेडने अधिक आहे, तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे.

पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणउत्तरेकडून अधिक उंचीवरून मुंबईत विनाअडथळा येणारे थंड कोरडे वारे आणि खालच्या पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्वदिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, सह्याद्रीतून वाऱ्याची दिशा बदलातून गुजरातच्या डांगी घळीतून मुंबईत प्रवेश करत आहे. ह्या वाऱ्यांच्या संयोगातून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवत आहे. हे वातावरण पुढील तीन दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरweatherहवामानRainपाऊस