शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Kolhapur Rain Update: पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, ७६ बंधारे पाण्याखाली; 'हे' राष्ट्रीय, राज्यमार्ग अद्याप बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 12:58 IST

राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी गुरुवारी दिवसभर चार इंचांनी वाढून ४१ फूट आठ इंचांवर पोहोचली. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी वाढण्याचा वेग मंदावला आहे; पण पाणी पातळी धोका पातळीकडे जात असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, पाटबंधारे प्रशासनाने राधानगरी धरणातून ७ हजार ३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. जिल्ह्यातील एकूण ७६ बंधारे पाण्याखाली आहेत.

शहर आणि जिल्ह्यात दिवसभर पाऊस राहून राहून कोसळत राहिला. सकाळी लख्ख ऊन पडले होते. श्रावणातील ऊन-पाऊस वातावरणाचा अनुभव घेता आला. तळ कोकणातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोरदार राहिला. यामुळे राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते. यातील एक दरवाजा बंद होवून सध्या चार स्वयंचलित दरवाजे खुले असून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे.दिवसभर जिल्ह्यात सरासरी २६.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पावसाची नोंद आजरा तालुक्यात झाली आहे. सर्वच नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा अधिक आहे. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथील ५ कुटुंबांतील २२ जण, तर करवीर तालुक्यातील चिखलीतील ४८८ कुटुबांंतील १६७१ जण नातेवाइकांकडे स्थलांतर झाले आहेत. एकूण १७५३ जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

कसबा बावडा-शिये रस्ता बंद

कसबा बावड्यातून शिये फाट्यावर जाणाऱ्या रस्त्यावर टोलनाक्याजवळ पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

बंद रस्ते असे :राष्ट्रीय महामार्ग :कोल्हापूर-वैभववाडी, कोल्हापूर-रत्नागिरी.राज्यमार्ग : कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज-कोदाळी-भेंडशी, चिखली, वरणगे पाडळी- बाजारभोगाव-अनुस्करा, चंदगड- इब्राहिमपूर, बोरपाडळे- वाठार-वडगाव- हातकणंगले, अतिग्रे -कबनूर- इचलकरंजी-शिरढोण- टाकळी- खिद्रापूर, निढोरी-गोरंबे-कागल-यळगूड-रेंदाळ.

एसटीचे बंद असलेले मार्ग : कोल्हापूर ते गगनबावडा, इचलकरंजी ते कुरुंदवाड, गडहिंग्लज ते ऐनापूर, मलकापूर ते शित्तूर, चंदगड ते दोडामार्ग, गगनबावडा ते करूळ घाट, आजरा ते देवकांडगाव.

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुकोयना धरणाचे सहावक्र दरवाजे आज, शुक्रवारी सकाळी दहा उघडण्यात आले असुन कोयना नदीत एकुण १०१०० क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सुरक्षतेच्या कारणास्तव कोयना कृष्णानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसKolhapur Floodकोल्हापूर पूरradhanagari-acराधानगरी